61 वी पुरुष/महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेसाठी जिल्हा खो खो संघ निवड चाचणी….!!!!!
जळगांव – महाराष्ट्र खो खो असोसिएशनने 2025-26 या वर्षाची पुरुष व महिला विभागाची 61 वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा बीड येथे आयोजित केली आहे. त्यासाठी जळगांव जिल्हा खो खो असोसिएशन तर्फे सन 2025-26 ची पुरुष/महिला गटाची निवड चाचणी मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता जळगांव जिल्हा क्रीडा संघ मैदानावर ( व.वा.वाचनालय ) घेण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी आमदार चंद्रकांत सोनवणे , प्रा.डी. डी. बच्छाव , शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव पोळ, उदय पाटील, प्रा.श्रीकृष्ण बेलोरकर , सुनिल समदाणे , राज्य सहसचिव जयांशू पोळ, सौ.विद्या कलंत्री यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
1) राहुल पोळ – 9404292714
2) दत्तात्रय महाजन – 7020751823
3) विशाल पाटील – 9970308326
4) दिलीप चौधरी – 9158469294

















