डॉ. डि.के.सी. विद्यालयाच्या 2003-2004 च्या दहावीच्या बॅचचे स्नेह संमेलन संपन्न
जळगांव :- डांभूर्णी तालुका यावल जिल्हा जळगाव येथील नवयुवक विद्या प्रसारक मंडळ संचालित डॉ. डि.के.सी. विद्यालयच्या माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे (2003-2004 च्या दहावीच्या बॅचचे) स्नेह संमेलन दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.छगन वाणी सर होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री.विवेक दिवाकर चौधरी हे उपस्थितीत होते. तसेच कार्यक्रमाला माजी शिक्षकांच्या वतीने श्री. चंद्रकांत नेहेते सर, श्री. आर. जी.नारखेडे सर, श्री.सुरवाडे सर श्री.उमाकांत भादले सर, श्री.अनिल अत्तरदे सर. तसेच सध्या कार्यरत शिक्षकांपैकी शाळेचे मुख्याध्यापक श्री.उमाकांत महाजन सर, उपशिक्षक श्री. ठाकूर सर, श्री.निळे सर, श्री.उद्धव पाटील सर, श्री. विवेक महाजन सर, चेतन सरोदे सर, जनार्दन दादा यांची उपस्थिती होती.
स्नेह संमेलना च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल 20 वर्षां नंतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींची झाली भेट. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी केयुर पाटील, कांचन कासार, प्रविण कोळी यांनी केले.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पराग फालक, मोनिका करांडे, नीता कोळी, जयंत पाटील, यामिनी सरोदे तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
स्नेह-संमेलन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील मित्रत्वाच्या नात्याची वीण अधिक घट्ट झाली असून, त्यातून प्रेरणा घेऊन दर वर्षी उत्स्फूर्तपणे सर्वांनी एकत्र जमून सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. शाळेला माजी विद्यार्थ्यांनी वॉटर प्युरिफायर आणि वॉटर कूलर तसेच वीज गेल्यावरही चालू शकणारा ब्लू टूथ स्पीकर आणि माईक चा सेट शाळेला भेट दिला. माजी विद्यार्थ्यांच्या ह्या उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.