दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय चोपडा येथे पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय चोपडा येथे पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी

 

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा व नेहरू अभ्यास व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 नोव्हेंबर रोजी पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. के. एन. सोनवणे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून   उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. बी. सूर्यवंशी   महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए. वाघ तर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. व्ही. आर. कांबळे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू संशोधन अभ्यासक्रम केंद्राचे समन्वयक डॉ. आर.आर. पाटील यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. व्ही. आर. कांबळे यांनी आपल्या व्याख्यानातून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कार्याचा परिचय उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. के. एन सोनवणे यांनी दिनविशेष साजरे करण्यामागील भूमिका व उद्देश विद्यार्थ्यांना विविध उदाहरणातून स्पष्ट करून सांगितला. तसेच महापुरुषांचे विचार हे सूर्यकिरणासारखे सतत आपल्या जीवनाला दिशा देत असतात असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमाप्रसंगी  डॉ.डी. डी. कर्दपावर, सौ. एस. बी. पाटील, डॉ. एस. एन. पाटील, मयूर पाटील, डॉ. मोतीराम पावरा, चेतन बाविस्कर, संदीप पाटील, रुपेश पाटील तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.