चोपडा महाविद्यालयाचे ११ विद्यार्थी चमकले विद्यापीठ गुणवत्ता यादीत

चोपडा महाविद्यालयाचे ११ विद्यार्थी चमकले विद्यापीठ गुणवत्ता यादीत

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या एप्रिल/मे २०२२ च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. दरवर्षीप्रमाणेच विद्यापीठ गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी हे उत्तुंग यश मिळविले आहे. नुकत्याच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यातर्फे एप्रिल/मे २०२२ मध्ये घेतलेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या गुणवत्ता यादीत महाविद्यालयातील बीएस्सी. इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थीनी साळी लतिका राजेंद्र (९.५६ सीजीपीए ग्रेड) प्राप्त करीत विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा मान मिळवला. बीएस्सी. इलेक्ट्रॉनिक्स विभागातील सोनवणे कोमल लक्ष्मण या विद्यार्थिनीने (९.३९ सीजीपीए ग्रेड) मिळवीत विद्यापीठ गुणवत्ता यादी द्वितीय क्रमांक पटकावला तर दानेश अली सादिक अली या विद्यार्थ्याने (९.३५ सीजीपीए ग्रेड) प्राप्त करीत विद्यापीठ गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक मिळविला आहे. एम.एस्सी इलेक्ट्रॉनिक्स वर्गातील पाटील आकाश जितेंद्र या विद्यार्थ्याने (९.८ सीजीपीए ग्रेड) प्राप्त करीत विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तसेच वाघ कल्पेश प्रल्हाद या विद्यार्थ्याने (९.५५ सीजीपीए ग्रेड) प्राप्त करून विद्यापीठ गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त करण्याचा मान मिळवला आहे. टी.वाय.बीकॉम वर्गातील पाटील चेतना छोटू या विद्यार्थिनीने (९.७८ सीजीपीए ग्रेड) प्राप्त करीत विद्यापीठ गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक पटकावला. एम.कॉम या वर्गातील पाटील अंकिता संजय या विद्यार्थिनीने (९.९४ सीजीपीए ग्रेड) प्राप्त करून विद्यापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर गुजराथी साक्षी नितीन या विद्यार्थिनीने (९.८८ सीजीपीए ग्रेड) मिळवून विद्यापीठ गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक प्राप्त केला. टी. वाय.बी.ए. हिंदी या विषयातील सपकाळे विशाल गोपीचंद या विद्यार्थ्याने (९.६६ सीजीपीए ग्रेड) मिळवून विद्यापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. एम.ए. मराठी वर्गातील पाटील हेमंत राजेंद्र या विद्यार्थ्याने (१०.०० सीजीपीए ग्रेड) प्राप्त करीत विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला. एम.ए.अर्थशास्त्र विषयाचा विद्यार्थी मगरे आकाश कैलास याने (९.८१ सीजीपीए ग्रेड) प्राप्त करून विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला.
महाविद्यालयातील जवळपास ११ विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गुणवत्ता यादीत मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिता संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे त्याचप्रमाणे रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.