आमदार कर्डिले यांच्या निधनाने पोरक्या झालेल्या मीरी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व आमदार मोनिकाताई राजळे यांनी स्विकारावे : कार्यकर्त्यांची मागणी

आमदार कर्डिले यांच्या निधनाने पोरक्या झालेल्या मीरी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व आमदार मोनिकाताई राजळे यांनी स्विकारावे : कार्यकर्त्यांची मागणी

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनामुळे राहुरी विधानसभा मतदार संघातील पाथर्डी तालुक्यातील मीरी जिल्हा परिषद गट हा अत्यंत पोरका झाला आहे.त्या गटाचे नेतृत्व शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी स्विकारावे अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.मीरी जिल्हा परिषद गटातून आमदार मोनिकाताई राजळे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती.त्या प्रथमच या गटातून निवडून गेल्यावर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष ही झाल्या होत्या.मीरी जिल्हा परिषद गटावर अनेक वर्षे स्व.मोहनराव पालवे आणि स्व.अनिलराव कराळे या शिवसेनेच्या शिलेदारांनी आपलंच नेतृत्व गाजवले होते.पालवे- कराळे हे आता दोन्ही हयात नसताना त्यांच्या नंतर पुलाखालून बरेच राजकीय पाणी वाहून गेले आहे.आणि आता अचानक आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या जाण्याने या जिल्हा परिषद गटातील राजकीय समिकरणे पुर्ण पणे बदलली गेली आहेत.गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या निवडणुका न झाल्याने अनेक वर्षांपासून या मीरी जिल्हा परिषद गटात अनेक हौश्या नौश्यांनी कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी गुढग्याला बाशिंग बांधून तयारी केली होती. ती भुमिका आता फोल ठरली आहे.त्यामुळे आमदार मोनिकाताई राजळे यांनी या जिल्हा परिषद गटात लक्ष घातल्यास या गटातून भाजपचाच उमेदवार निश्चित विजयी होऊ शकतो.आमदार मोनिकाताई राजळे यांनी ठरवलेला उमेदवार निश्चितच आपल नवीन राजकीय अस्तित्व निर्माण करू शकणार आहे.जून्या लोकांना बाजूला सारून नवीन चेहरा दिला तर भाजपला आपला झेंडा फडकावण्यास वाव मिळू शकतो. आगामी पुढील वेळीच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक तालुक्यातून स्वतंत्र आमदार निवडून येणार आहे.पाथर्डी तालुक्याची आता शकलं शकलं उडालेली आहेत. तिसगाव पासून पश्चिमे कडील काही गावे राहुरी तालुक्याला तर उर्वरित राहीलेली गावे ही शेवगाव तालुक्याला जोडलेली आहेत. स्वतंत्र तालुक्याला स्वतंत्र आमदार झाल्यास पाथर्डी तालुक्यातील ३९गावे जी आता राहुरी तालुक्याला जोडलेली आहेत ती गावे मतदार संघाच्या नवीन पुनर्रचने नंतर पाथर्डी तालुक्याला जोडली जाणार आहे.या राहुरी तालुक्याला जोडलेल्या गावावर आपली पकड मजबूत करण्यासाठी आमदार मोनिकाताई राजळे यांनी आता पासूनच लक्ष दिल्यास त्याचा भविष्यातील राजकारणास त्यांना निश्चितच फायदा होणार आहे.मीरी जिल्हा परिषदेची जागा ही सर्व साधारण महिलेसाठी राखीव झाल्याने अनेक नेत्यांनी आपल्या सौभाग्यवती ना या निवडणुकीत उभे करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आता राजकीय घडामोडी पाहता आमदार मोनिकाताई राजळे यांनी या जिल्हा परिषद गटात लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.आमदार राजळेंनी या गटातून नवीन महीला चेहऱ्यावर आपली नजर मेहेरबान करून उमेदवार जाहीर करावा असा सामान्य मतदार व कार्यकर्त्यांचा सूर निघत आहे. गोपनीय राजकीय घडामोडी पाहता आमदार मोनिकाताई राजळे या ऐन वेळी जिल्हा परिषद निवडणूकीत नवीन उमेदवारांच्या नावाचा बाॅंब टाकून सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊन राजकीय रंगत वाढविणार आहेत.आणि मग गुढग्यावर बाशिंग बांधलेल्या अनेकांना आपल्या राजकीय तलवारी म्यान कराव्या लागणार आहेत. महायुती कडून ही जागा भाजपने लढविल्यास महाविकास आघाडी ही जागा नेमकी राष्ट्रीय कॉंग्रेस, उबाठा शिवसेना की एस पी राष्ट्रवादी या पैकी कोणत्या पक्षाला सोडणार या वरही पुढील बरीच राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. गेल्या वेळी राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर पालवे तर शिवसेनेचे तिकिटावर कराळे यांनी बाजी मारत विजय संपादन केला होता.