जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत गोपीचंद पुना पाटील,विद्यालयाचे जयदीप,गौतम व अर्णव यांचे घवघवीत यश….!!!!!!

जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत गोपीचंद पुना पाटील,विद्यालयाचे जयदीप,गौतम व अर्णव यांचे घवघवीत यश….!!!!!!

 

कोळगाव ता.भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत, *गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव* येथील तथा *किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे* खेळाडू जयदीप सोनवणे याने मानाच्या १०० व २०० मीटर मध्ये प्रथमस्थान प्राप्त केले आहे तर गौतम पाटील याने ८०० व १५०० मीटर धावण्यात आपला दबदबा कायम राखला तर अर्णव खैरणार याने २०० व ४०० मीटर मध्ये आपले कौशल्य पणाला लावत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा गाजवली.

तिघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय,जळगाव तथा पाचोरा तालुका क्रीडा समितीतर्फे, एम.एम.महाविद्यालय,पाचोरा येथील मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात विजयी–उपविजयी होत तिघा खेळाडूंची स्व.मीनाताई ठाकरे,विभागीय क्रीडा संकुल,हिरावाडी,पंचवटी,नाशिक येथे होणाऱ्या शालेय विभागस्तरीय मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

*स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे….!!!!*

 

*_१९ वर्षाआतील (मुले)_*

 

*१) जयदीप कैलास सोनवणे (१०० मीटर व २०० मीटर धावणे दोघींमध्ये प्रथमस्थान)*

 

*२) गौतम गोपाल पाटील (८०० मीटर धावणे प्रथम तसेच १५०० मीटर धावणे द्वितीय)*

 

*३) अर्णव संदीप खैरणार (४०० मीटर धावणे प्रथम तर २०० मीटर धावणे द्वितीय)*

 

स्पर्धेत घवघवीत यश मिळवणाऱ्या ॲथेलिट्सना *आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, प्रा.सतीष पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी* यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय *नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालय सचिव प्रशांतराव पाटील,प्राचार्य अनिल पवार, पर्यवेक्षिका सिमा शिसोदे* तसेच शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका आदिंनी आनंद व्यक्त करीत व अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.