जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे दशसूत्री कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केले आकर्षक आकाशकंदील

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे दशसूत्री कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केले आकर्षक आकाशकंदील

 

दत्तात्रय काटोले

सोयगाव, ता. १० ऑक्टोबर – जिल्हाधिकारी मा. दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतील “दशसूत्री” कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेले रंगीबेरंगी आकाशकंदील सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या उपक्रमाचे आयोजन गटशिक्षणाधिकारी श्री. सचिन शिंदे व केंद्रप्रमुख श्री. फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यानुभव निदेशक श्री. चव्हाण यांच्या पुढाकाराने व मुख्याध्यापक श्री. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

विद्यार्थ्यांनी रंगीत कागदाचा वापर करून विविध आकारांचे आणि आकर्षक रंगसंगतीचे आकाशकंदील तयार केले. हे सर्व कंदील शाळेच्या आवारात प्रदर्शनासाठी लावण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेचे व कल्पकतेचे दर्शन घडवित आहेत.

उपक्रमामध्ये पदवीधर शिक्षिका सौ. सुरेखा चौधरी, श्री. रामचंद्र महाकाळ, सौ. मंगला बोरसे, सौ. प्रतिभा कोळी, श्री. अंकुश काळे व श्री. बिलाल बागवान यांनी मोलाचे योगदान दिले.

विद्यार्थ्यांनी पूर्णतः स्वतःच्या कल्पनाशक्तीने आणि मेहनतीने तयार केलेल्या आकाशकंदीलामुळे त्यांच्यात आनंद व आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसून येत होते.