छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षा निमित्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे पाकिटे वाटप

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षा निमित्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे पाकिटे वाटप

 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षा निमित्त मा.ना.गिरीषभाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून आज जळगाव जिल्ह्यात ३५० पेक्षा जास्त गावांतील शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या सहकार्याने मोफत बियाणे वितरण करण्यात आले. यासाठी पाचोरा तालुक्यातील पुनगांव गावांतील शेतकऱ्यांना मोफत बियाणे पाकिटे वाटप करून सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी जळगांव लोकसभेचे खासदार उन्मेषदादा पाटील,पाचोरा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव साहेब व कृषी विभागचे इतर अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.