शेतकऱ्यांना तात्काळ शासनाने मदत करावी :खा. शोभाताई बच्छाव – कॉग्रेस चा पहाणी दौरा पुर्ण 

शेतकऱ्यांना तात्काळ शासनाने मदत करावी :खा. शोभाताई बच्छाव कॉग्रेस चा पहाणी दौरा पुर्ण

 

 

पाचोरा (प्रतिनिधी) –

 

उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचा पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने समिती गठीत केली असून या समिती ने तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागातील पहाणी केली. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी समिती अध्यक्षा खा. शोभाताई बच्छाव यांनी मागणी केली आहे.

 

 

 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर महाराष्ट्र मध्ये अचानक अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाली असून यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या मार्गदर्शनानुसार समिती गठीत करण्यात आली या समितीमध्ये अध्यक्ष खासदार शोभाताई बच्छाव, आमदार . हेमंत उगले प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ पानगव्हाणे, अॅड. संदीप पाटील यांचा समावेश होता सदर समितीने तालुक्यातील निंभोरी, सातगाव डोंगरी, शिंदाड या ठिकाणी भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या शिंदाड येथे शेतकरी संवाद बैठक घेण्यात आली सातगाव डोंगरी येथे नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली या ठिकाणी आमदार आणि मंत्री यांनी एक लाख रुपये प्रति कुटुंब देण्याचे आश्वासन दिल्यावर देखील ते अद्यापही पूर्ण झालेले नाही याबाबत पीडित ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी आपल्या व्यथा खासदार शोभाताई बच्छाव आणि समिती पुढे मांडल्या या समितीच्या दौऱ्यात कॉग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, सेवादल अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष उद्धव वाणी प्रदेश सरचिटणीस प्रवीण सुरवाडे, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल फकीरा, जिल्हा चिटणीस प्रताप पाटील, युवक विधानसभा अध्यक्ष मनोहर महाले, उबाठा सेनेचे माजी जि प सदस्य उद्धव मराठे, सरचिटणीस राजेंद्र महाजन, प्रकाश चव्हाण,, युवक काँग्रेसचे शुभम पाटील, ओबीसी चे चेतन बोदवडे हजर होते यावेळी खासदार शोभाताई बच्छाव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केंद्र आणि राज्य यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणं खूप गरजेचे असून ज्यांच्या घरात पाणी घुसलं आणि ज्यांचे गुरेढोरे वाहुन गेली यांना रोखीने तात्काळ मदत करावी, कोरडवाहू जमिनीला हेक्टरी ५०हजार व बागायत जमिनीला हेक्टरी १लाख मदत करावी अशी मागणी करत या समितीचा अहवाल तात्काळ राज्य सरकार व राज्यपाल आणि केंद्राकडे देऊन शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले यातच सातगाव डोंगरी येथे ज्यांच्या घरात पाणी घुसले त्यांना स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याशी कॅमेरा समोर फोन कॉलद्वारे बोलून एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे ती तात्काळ द्यावी आणि तशीच मदत संपूर्ण तालुक्यातील व शहरातील ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना देखील द्यावी अशी मागणी केली आहे.