शिवतीर्थ जळकी बाजार येथे शिवव्याख्याते अक्षय लोखंडे पाटील,पारधकर यांचे कीर्तन
जळकी बाजार ( श्री महेंद्र बेराड तालुका प्रतिनिधी) : शिवतीर्थ जळकी बाजार येथे संघर्ष दुर्गामाता मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रीनिमित्त भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कीर्तन सोहळा दिनांक ३० सप्टेंबर २०२५, मंगळवार रोजी रात्री साडेआठ वाजता पार पडणार आहे.
या प्रसंगी ह. भ. प. श्री अक्षय लोखंडे पाटील, पारधकर (शिवव्याख्याते) यांचे प्रभावी, प्रेरणादायी कीर्तन होणार असून भक्तांना आध्यात्मिक समाधान आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.
आयोजक मंडळाच्या वतीने सर्व ग्रामस्थ, भगिनी, मातृशक्ती, युवा वर्ग तसेच भाविक बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, “कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व सोहळ्याला यशस्वी करावे.”