श्री नागवेली दुर्गा उत्सव मंडळ,पारध येथे नवरात्रउत्सवानिमित्त कालिंका भजनी मंडळातर्फे सामाजिक प्रबोधनपर भारूड सादरीकरण
पारध (शाहूराजा) (श्री महेंद्र बेराड सर |भोकरदन तालुका प्रतिनिधी):नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारध (शाहूराजा) येथे श्री नागवेली दुर्गा उत्सव मंडळ व कालिंका भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानक परिसरात सामाजिक प्रबोधनपर भारूड सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले. समाजातील विविध गंभीर प्रश्नांवर चिंतन घडवून आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम पार पडला.
या कार्यक्रमात हुंडाबंदी, ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, स्त्रीशिक्षण, बालविवाह निर्मूलन या विषयांवर प्रभावी भारूड सादर करण्यात आले. कलावंतांच्या दमदार भूमिकांमुळे व भावपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित नागरिकांना सामाजिक जाणीव देण्याचे कार्य घडले.
या प्रबोधनपर भारूड सादरीकरणात पथक प्रमुख कमलबाई देशमुख यांच्यासह लिलाबाई लोखंडे, भिकुबाई सपकाळ, मिराबाई इखनकर, कौशल्याबाई लोखंडे, उषाताई बोराडे, देविदास इखनकर, साहेबराव मोकाशे, राजु सपकाळ, छगन लोखंडे, कैलास लोखंडे या कलावंतांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष शुभम काटोले,उपाध्यक्ष राहुल काटोले,सचिव ऋषिकेश तेलंग्रे, बारी समाजातील जेष्ठ सदस्य श्री बाबुराव बेराड,श्री गंगाराम तेलंग्रे, सुनील सर तेलंग्रे,श्री राजू शिंदे सर, श्री महेंद्र बेराड सर,संदीप पायघन,भगवान बेराड,समाधान बोडखे,कृष्णा तेलंग्रे, योगेश गाडेकर,ओम गाडेकर,सागर तेलंग्रे,रवी गाडेकर,समाधान गाडेकर, विठ्ठल गाडेकर,भाऊसाहेब तेलंग्रे,अजय काटोले,सुमित बेराड,ऋषिकेश तेलंग्रे,रवि बेराड,राजू काटोले, विकास तेलंग्रे,यश काटोले, निखिल बेराड,गोपाल तेलंग्रे,अजय तेलंग्रे,सागर तेलंग्रे,अनिकेत बेराड,सुरज बोडखे, कपिल बोडखे, गणेश बोराडे,पंकज तेलंग्रे, पवन तेलंग्रे,मंगेश काटोले,शेरा तडवी,गजू काटोले यांसह बारी समाज बांधव,नागवेली दुर्गा उत्सव मंडळाचे सर्व सभासद, तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ व कला रसिक उपस्थित होते.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. गावात जागृती, ऐक्य आणि सांस्कृतिक एकात्मतेचे वातावरण या उपक्रमातून निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.