माजीमंत्री तनपुरे, पालकमंत्री विखे, खासदार लंके यांचा एकाच वेळेस शेवगाव पाथर्डीतील पुरग्रस्त भागाचा नुकसान पाहणी दौरा
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री प्राजक्त तनपुरे,अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील,आणि खासदार निलेश लंके साहेब यांनी एकाच दिवशी आणि एकाच वेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या शेतात,घरात, दुकानाची, रस्त्यांची झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी करंजी, तिसगाव, कासार पिंपळगाव येथे जाऊन पुरग्रस्त भागाची पाहणी केली.त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,क्रुषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाच्या सायली पाटील, स्वप्निल काळे, पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब,पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब, सरपंच मोनालीताई राजळे,राहुल राजळे, ग्रामसेवक प्रमोद म्हस्के आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.कासार पिंपळगाव येथील कवळे कुटुंब, आणि मधला मळा येथिल पुराच्या पाण्यात अडकलेले माजी सैनिक असलेले भाऊसाहेब राजळे,त्यांचे बंधू अप्पासाहेब राजळे,पुतणे राजेंद्र राजळे, अशोक केळकर यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.महसुल खात्याच्या अधिकाऱ्यांना नदीकाठच्या पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करण्याचे आदेश नामदार महोदयांनी दिले.या पुराच्या पाण्यात शेळ्या,गाया, म्हशी म्रुत्युमुखी पडलेल्या असताना सदर जनावरांच्या कानात विमा कंपनीचे बिल्ले नसल्याने पंचनामे करता येत नाही अशी एका अधिकाऱ्याने बतावणी केली होती.हे सदर पुरग्रस्त शेतकऱ्याने पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर सांगून नाठाळ अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची चांगली भांडाफोड करून बोंबाबोंब केली.सदर अधिकाऱ्यांची नामदार विखे पाटील यांनी समोर उभे करून चांगलीच कानउघाडणी केली.कोणत्याही प्रकारच्या सबबी न सांगता नुकसान झालेल्या भागाचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी लगेच प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.कासार पिंपळगावचे कृषी मित्र संदिप राजळे यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबद निवेदन दिले होते.त्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की सर्व शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी.सध्या शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीतून जात आहे.शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.कांदा,ऊस, सोयाबीन या सारख्या सर्व पिकांचे खर्चही निघत नाही.उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे.तर काही मृत्यूमुखी पडले आहे.शेतजमिनीत गाळ साचल्यामुळे पुन्हा शेती करणं कठीण झाले आहे.या परीस्थितीत शेतकऱ्यांकडून कर्ज फेड होणे हे अशक्य झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे अत्यंत आवश्यक आहे.असे निवेदनात म्हटले आहे.हनुमान टाकळी येथील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर करून ही तेथे न गेल्यामुळे तेथील पुरग्रस्त भागातील आदिवासी समाजातील कुटुंबानी तीव्र नाराजी व्यक्त केली.ते पुढे अमरापूर,सुसरे येथे रवाना झाले. खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी करंजी तिसगाव येथे संयुक्तपणे दौरा करून पुरग्रस्तांना पॅकेजचे वाटप केले.त्यांच्या समवेत मीरी जिल्हा परिषद गटातील माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती उषाताई कराळे,शिवसेनेचे नेते रफिक शेख,मीर्झा मन्यार,पीनू मुळे, राजेंद्र दगडखैर,वामन चष्मावाला, हे उपस्थित होते.तिसगावच्या कोठ भागातील बुखरा सिकंदर शेख या महीलेला महावितरण कंपनीच्या तुटलेल्या तारांचा शाॅक लागून ती गंभीर जखमी झाली होती.तीला खासदार निलेश लंके यांच्या गाडीतून दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.पत्रकारांशी बोलताना खासदार निलेश लंके साहेब म्हणाले की रस्ते,दुकाने, तलाव,घर, दुचाकी,चारचाकी यांच्या साठी शासकीय निधी मिळविण्या पेक्षा शासनाने तात्काळ एकरकमी मदत जाहीर करावी.नुसते बोगस नाटक नको.सार्वजनिक रस्ते त्वरित करा असे सांगितले.लंके यांनी करंजी,सातवड, देवराई,तिसगाव, नंतर पाथर्डी परीसरातील अनेक ठिकाणी भेटी दिल्या.दुपार नंतर शेवगाव तालुक्यात काही ठिकाणी पाहणी केली.लोकसभा निवडणुकीत कासार पिंपळगाव, जवखेडे,हनुमान टाकळी, कोपरे,वाघोली या गावात मतांचा जोगवा मागूण मीटूमिटू बोलणारे खासदार निलेश लंके साहेब निवडून गेल्यावर आता संकटाच्या वेळी कोठे आहेत असा सवाल या पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.खासदार लंके साहेब यांनी या भागाला भेट न दिल्याने अनेक पुरग्रस्तांनी या बाबत खासदार निलेश लंके साहेब यांच्या विषयी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.मंत्री विखेपाटील आणि खासदार लंके साहेब या दोघांनी ही हनुमान टाकळी कोपरे वाघोली येथे जाण्याचे टाळल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.

























