पाचोऱ्यात नेटवर्क अकॅडमीतर्फे D.C.T.Ed प्रमाणपत्र व संगणक वाटप सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्यात नेटवर्क अकॅडमीतर्फे D.C.T.Ed प्रमाणपत्र व संगणक वाटप सोहळा उत्साहात संपन्न

 

 

 

 

पाचोरा: ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित नेटवर्क अकॅडमी येथे राज्यस्तरीय कौशल्य विकास अभियान अंतर्गत D.C.T.Ed (डिप्लोमा इन कॉम्प्युटर टीचर एज्युकेशन) संगणक अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्र व संगणक वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पाचोरा येथील नेटवर्क अकॅडमी, प्रकाश टॉकीजजवळ, जेडीसीसी बँकेसमोर दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन श्री. अतुल भाऊ संघवी हे होते. व्यासपीठावर पाचोरा पीपल्स बँकेचे संचालक ॲड. अविनाश भालेराव आणि अनिल येवले, गो.से. हायस्कूलचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. उज्वला महाजन, नायब तहसीलदार रणजित पाटील, पालक प्रतिनिधी दीपक माने आणि पत्रकार उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. अकॅडमीचे संचालक गोकुळ सोनार यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याचा आणि उद्देशाचा आढावा घेतला. त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

अध्यक्षीय भाषणात श्री. अतुल भाऊ संघवी म्हणाले की, पाचोरासारख्या लहान शहरात असलेली ही संस्था केवळ रोजगारच देत नाही, तर विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल युगात खंबीरपणे उभे राहण्यास शिकवते. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाचे भविष्यातील महत्त्व व फायदे यावरही मार्गदर्शन केले. पाचोरा पीपल्स बँकेचे संचालक ॲड. अविनाश भालेराव यांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य आणि वक्तृत्वाचे कौतुक केले. श्री. नरेंद्र पाटील आणि सौ. उज्वला महाजन यांनी गोकुळ सोनार यांच्या परिश्रमाचे आणि संस्थेच्या वाटचालीचे कौतुक केले. नायब तहसीलदार श्री. रणजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल क्रांतीचे महत्त्व पटवून दिले आणि संस्थेच्या कार्यासाठी शाबासकी दिली.

 

यावेळी तुषार कापडे, स्वप्नील चौधरी, अबू तालीम आणि अल्फिया सादिक या विद्यार्थ्यांनी, तसेच दीपक माने आणि शेख सादिक या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

D.C.T.Ed अभ्यासक्रमात विशेष गुणवत्ता मिळवणाऱ्या राखी देशमुख, श्रेया घोरपडे, तुषार कापडे, स्वप्नील चौधरी आणि शेख अबू तालिब यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर, अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पात्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते संगणक वाटप करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सागर बाविस्कर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर बाविस्कर, समर्थ मोगरे आणि प्रशांत बिराडे यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.