पाडळी शिवारात २३,६२०रुपयाचा विनापरवाना दारू साठा जप्त,पाथर्डी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या 

पाडळी शिवारात २३,६२०रुपयाचा विनापरवाना दारू साठा जप्त,पाथर्डी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्वच ढाब्यावर विनापरवाना दारू विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. दारूचा जास्त प्रमाणात अतिरेक झाला की ग्रामस्थ मग पोलिसांना खबर देउन कारवाई करण्यास भाग पाडतात.अशीच एक कारवाई अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाडळी गावातील शिवारात घडली असून अवैध दारू विक्री करताना पाथर्डी तालुक्यातील पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.रवीवार दिनांक २४ऑगष्ट २०२५ या पोळ्याच्या करीच्या दिवशी रात्री पाडळी गावात रावसाहेब बाबुराव फुलमाळी (वय ३३) राहणार पाडळी, तालुका पाथर्डी,व कृष्णा बाबुराव फुलमाळी राहणार भातकुडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर, हे दोघे जण पाडळी गावातील राहते घरी विनापरवाना देशी विदेशी कंपनीचा सीलबंद अवैध दारू साठा विक्री करताना आढळून आले, त्यांच्या कडून १०,५८० रूपये किमतीचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे.दुसरी कारवाई ही शेवगाव तिसगाव रस्त्यावर पाडळी गावाच्या शिवारातील हाॅटेल प्रिती येथे केली.त्या हॉटेल प्रिती मध्ये सिनप्पा बाबुराव फुलमाळी आणि सुनिल शिवराम फुलमाळी , हे दोघे राहणार पाडळी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर हे चोरून विनापरवाना बेकायदेशीर देशी विदेशी कंपनीचा अवैध दारू साठा विक्री करताना आढळून आले.त्यांच्याकडे १३,०४०रुपये किंमतीचा सीलबंद अवैध दारू साठा आढळून आला असून पाथर्डी पोलिसांनी तो जप्त केला आहे. या बाबत पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ई अन्वये वेगवेगळ्या स्वरूपात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आणि चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या पथकातील पोलिस कॉन्स्टेबल संजय जाधव,धनराज चाळक,ईजाज सय्यद, अशोक बडे,अमोल घुगे, निलेश गुंड, संभाजी सानप यांनी केली आहे.पुढील तपास नवीन सहाय्यक फौजदार नितीन दराडे हे करीत आहेत.या छापेमारीत एकूण २३,६२० रुपये किंमतीचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे.