कु.प्रियंका देवरे राज्यस्तरीय कलाविष्कार प्रथम क्रमांक पुरस्काराने सन्मानित

कु.प्रियंका देवरे राज्यस्तरीय कलाविष्कार प्रथम क्रमांक पुरस्काराने सन्मानित.
-चाळीसगावच्या शिरपेचात मानाचा तुरा-

चाळीसगाव-
चाळीसगाव येथील कु. प्रियंका विजय देवरे यांना नुकताच स्पर्श सेवाभावी संस्था, अहमदनगर तर्फे राज्यस्तरीय कलाविष्कार 2024 या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने त्यांना सन्माननीत केले गेले. कत्थक नृत्यकला व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे असलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मानपत्र, शाल मानाचा फेटा मेडल स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रियंका देवरे यांना आतापर्यंत राज्यस्तरीय कलार्पण ,उमंग, कलानंद कथ्थक नृत्य संस्था बाबाज थिएटर नाशीक, कथ्थक नृत्य स्पर्धा अशा अनेक ठीकाणी सन्मानित केले गेले पद्मश्री स्व सिंधुताई सपकाळ यांच्या सकन्या ममताताई सपकाळ सिंधुताईंचे मानसपुत्र विजयदादा सपकाळ विधानसभा सदस्य प्राजक्त दादा तानपुरे सौ. शुभागीताई पाटील अध्यक्ष टीचर्स असोसिएशन. इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. असुन त्यांनी विविध कला सांस्कृतिक कार्यक्रमात परिक्षक म्हणून देखील काम पाहिले आहे.
प्रियंका देवरे यांचे गुरु संजय भिमराव पवार असुन प्रियंका देवरे यांनी अखिल भारतीय गाधर्व महाविद्यालय मंडल , मुंबई व प्राचीन कला केंद्र , चंढीगढ विद्यापीठाकडून कत्थक विषय घेऊन प्रथम क्रमांकाने संगीत विशारद पदवी पुर्ण केली आहे. तसेच त्यांनी निरंतर शिक्षण अभ्यासक्रम अंतर्गत रंगगंध कलासक्त व्यास चाळीसगाव यांच्यातर्फे नाट्यशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेला आहे तसेच त्यांनी भारत गायन समाज पुणे विद्यापीठातर्फे क्रियात्मक परिक्षेसाठी परिक्षक म्हणून कार्य करतात विविध सांस्कृतिक कार्यक्रमास त्या परिक्षक म्हणून जातात
पुरस्कारावेळी मनोगत व्यक्त करतान प्रियंका देवरे यांनी सांगितले की हा पुरस्कार माझा नसून माझ्या सांस्कृतिक कलाविष्काराचा आहे मी सांस्कृतिक कार्यात सदैव कार्य करित राहिल.
त्या त्यांच्या पूर्ण यशाचे श्रेय आई ग.भा. रंजना विजय देवरे यांना देतात.