सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार श्री अनिल आबासाहेब येवले यांची नुकतीच दि पाचोरा पिपल्स बॅंक आमंत्रित संचालक पदी निवड

सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार श्री अनिल आबासाहेब येवले यांची नुकतीच दि पाचोरा पिपल्स बॅंक आमंत्रित संचालक पदी निवड

 

 

पाचोरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार आदरणीय श्री अनिल आबासाहेब येवले यांची नुकतीच दि पाचोरा पिपल्स बॅंक आमंत्रित संचालक पदी निवड झाल्याबद्दल महिला सुरक्षा समितीच्या सदस्या तसेच सामाजिक कार्यकर्त्या कडुन शाल,श्रीफळ ,बुके देऊन सत्कार करण्यात आला…! ही महिला भगिंनीकडुन सत्कार सन्मान होणे हे आपल्या पत्रकारांसाठी पहिल्यादाच अभिमानस्पद ऐतिहासिक क्षण आहे,म्हणतात ना “मुर्ती लहान किर्ती महान”..!

 

पाचोरा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब येवले यांची पाचोरा पीपल्स बँक च्या स्वीकृत सदस्य पदी नेमणूक झाल्याबद्दल पाचोरा येथील महिला सुरक्षा समितीच्या सदस्य सौ.ललिता ताई पाटील, सौ.वैशालीताई जडे, सौ.सरलाताई पाटील, प्रा.वैशालीताई बोरकर, प्रा.डाॅ.सौ.सुनिता ताई मांडोळे यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार आबासाहेब च्या घरी जाऊन सन्मान केला…

सर्व महिला भगिनींच्या पाठीशी आबासाहेब नेहमी उभे राहतात कुठल्याही कार्यामध्ये आवर्जुन वेळ काढुन त्यांचे सहकार्य करतात असे सौ.ताईंनी व सर्व महिला भगिनींनी सांगितले.