जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात
कारगिल विजय दिवस साजरा

जळगाव, दि. 26 – जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी यावर्षी जिल्ह्यातील शाहिद झालेले जवान यश दिगंबर देशमुख आणि निलेश सोनवणे यांच्या मातोश्रींचा सत्कार करण्यात आला. यावेळी कल्याण संघटक अनुरथ वाकडे. बी. आर. काळे यांचेसह उपस्थितांनी शहिदांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.