जि. प.उर्दू शाळा पिंपळगाव हरेश्वर येथे शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप कार्यक्रम
जिल्हा परिषद उर्दू शाळा पिंपळगाव हरेश्वर येथे शैक्षणिक साहित्य,गणवेश वाटप व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम नुकतेच संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे हे होते. मुख्य अतिथी म्हणून माजी सरपंच शांतीलाल तेली,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तालिब कुतुबुद्दीन हे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना तालीब शेख यांनी प्रस्तुत केली.डॉ शांतीलाल तेली यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मागील भरतीत शिक्षकांची रिक्त जागा भरण्यासाठी तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील व जि.प.सदस्य मधुभाऊ काटे यांनी केलेला पाठपुरावा व परिणाम स्वरूप मिळालेले शिक्षक याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले .
विद्यार्थी संख्या जास्त व शिक्षक संख्या कमी असल्या तरी शिक्षकांनी व शालेय व्यवस्थापन समिती यांनी शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले कार्याचे मधुकर काटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कौतुक केले. मुस्लिम समाज मध्ये सामाजिक बदल घडवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेणे गरजेच्या आहे.नवीन शिक्षक भरती मध्ये शाळेला शिक्षक मिळणे बाबत ताबडतोड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली व शाळेची समस्या मांडली.आपल्याला नक्की शिक्षक मिळेल असे आश्वासन मधुकर काटे यांनी दिले.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तालीब कुतबोद्दीन यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले. मधुकर काटे यांना लोकनायक पुरस्कार मिळाल्याने शालेय व्यवस्थापन समिती मार्फत त्यांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रम मध्ये सरपंच सुनंदाताई कैलास क्षीरसागर, शोभाताई शांतीलाल तेली, माजी सरपंच डॉ शांतीलाल तेली, हाफिज कुतबोद्दीन, हाफिज शाहिद, हाफिज जावेद,मौलाना रमजान, हाफिज रेहान, हाफिज जैद ,जुबेर पिंजारी,रहीम बागवान,खलील शेख, मोहसीन खान,अश्फाक बागवान, शकील खान, गुफरान शेख,जावेद शेख,इमरान शाह,तालीब काझी,हाफीज खान उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी मुख्याध्यापक अशपाक अन्सारी,अब्दुल मालिक,अबूउबैदा ,तौकीर शेख,समरीन शेख ,इरम शेख, यांनी परिश्रम कार्यक्रमात मोठी संख्या मध्ये पालक वर्ग उपस्थित होते.