परधाडे येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार प्रतिक महाजन यांची सर्वानुमते निवड

परधाडे येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार प्रतिक महाजन यांची सर्वानुमते निवड

पाचोरा – तालुक्यातील परधाडे येथे सरपंच शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न झाली
या ग्रामसभेत सर्वानुमते परधाडे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रतीक महाजन यांची निवड करण्यात आली
प्रतीक महाजन हे परधाडे गावातील एक तरुण पत्रकार असून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.
तंटामुक्ती समिती ही गावातील विविध वाद-विवाद आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष हे गावातील शिक्षित व्यक्ती म्हणून प्रतीक महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
प्रतीक महाजन यांनी निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी गावातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि गावातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी माझ्या सर्वोत्तम प्रयत्न करेन.”
प्रतीक महाजन यांची निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.