पंधरा दिवसांत आँखेगावच्या हरीजण वस्तीतील रस्ता दुरुस्त झाला नाही तर तेथेच चिखलात स्वतःला गाडून घेऊन आंदोलन करणार : प्रा.किसनराव चव्हाण यांचा इशारा ?
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पंधरा दिवसांत आँखेगावच्या हरीजण वस्तीतील रस्ता दुरुस्त झाला नाही तर तेथेच चिखलात स्वतःला गाडून घेऊन आंदोलन करणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसनराव चव्हाण यांनी दिला.ते अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आँखेगाव येथील तळे-ससाणे वस्तीवरील मागासवर्गीयांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता दुरुस्त करून मिळावा म्हणून शेवगाव पंचायत समितीच्या कार्यालयासमोर दिनांक ४ जुलै रोजी झालेल्या आंदोलना प्रसंगी ते बोलत होते.या वेळी महीला गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी हे आवर्जून उपस्थित होते.प्रा.किसनराव चव्हाण पुढे म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवून गेली ७५ वर्षे पूर्ण झाली तरी हा रस्ता दुरुस्त झाला नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.गेल्या १०० वर्षापासुन या गलीच्छ रस्त्यावरून गरोदर माता, शालेय विद्यार्थी, व्रुद्ध नागरिक हे वहीवाट करीत आहेत. दर वर्षी थोडा थोडा करून हा रस्ता बनवण्याचे काम गावातील सरपंच ग्रामसेवक यांनी कासवाच्या संथगतीने केले आहे.परंतू चारशे मीटर लांबीचा रस्ता एका शेतकऱ्याच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे तसाच नादुरुस्त अवस्थेत राहीलेला आहे. वारंवार मागणी करूनही हा रस्ता तसाच नादुरुस्त अवस्थेत राहिल्यामुळे तळे ससाणे वस्तीवरील मागासवर्गीय नागरीकांचे आतोनात हाल होत आहेत.म्हणून या वस्तीवरील साडे तीनशे लोकांनी या रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते.शेवगाव पंचायत समितीच्या महीला गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी पंधरा दिवसात हा रस्ता दुरुस्त करण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे.त्यामुळे हे आंदोलन तुर्तास थांबवले गेले आहे.या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष पॅरेलालभाई शेख, सदाशिव खर्चन, रविंद्र निळ,भागवत सर,राजू निकाळजे,शेख सलीम,राजु पठाण, सलीम शेख,अरुण खर्चन,रविंद्र ससाणे, विनोद तांबे,राजू खर्चन, शारदा खर्चन,शन्नोबी पठाण, शांता खर्चन,शिला खर्चन, वैशाली ससाणे,मनिषा तांबे,यांच्या सह गावातील शालेय विद्यार्थी,व वयोवृद्ध नागरिक आणि पंचक्रोशीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आखेगावचे सरपंच आणि ग्रामसेवक हे निष्क्रिय आहेत असा आरोप करत त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केल्याने शेवगाव पंचायत समिती कार्यालयातील परीसर दणाणून गेला होता. शासकीय अधिकाऱ्यांच्या लेखी पत्राच्या आश्वासनामुळे हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.पंधरा दिवसांत हा रस्ता दुरुस्त न झाल्यास मग संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांची पळता भुई थोडी केली जाईल असे वंचित आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे.पंधरा दिवसाची मुदत दिल्याने गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.