पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी धनगर समाज एसटी आरक्षणाचे वाटोळे केले बीड मधील धनगर समाज आरक्षण बैठकीतील सामान्य कार्यकर्त्यांचा सूर
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) धनगर समाजातील पश्चिम महाराष्ट्रातील धनगरांचे कैवारी असल्याचा खोटा दावा करणाऱ्या नेत्यांनीच खरे धनगर समाजाच्या एस टी प्रमाणपत्र आरक्षणाचे वाटोळे केले असा आरोप बीड मधील धनगर समाज आरक्षण संदर्भातील समन्वयकाच्या चिंतन बैठकीत सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून धनगर समाज एसटी आरक्षणाचा प्रश्न सरकारने जाणून बुजून प्रलंबित ठेवला आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सन २०१४ सालच्या निवडणुकीत पंढरपूर येथे आमचं सरकार आल्यावर मंत्री मंडळाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देतो असे खोटे आश्वासन दिले होते.परंतू दहा वर्षे झाली परंतु फडणवीस साहेब दोन वेळा मुख्यमंत्री झाले पण धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले नाही ही खरी वस्तुस्थिती आहे.गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज एसटी आरक्षणाचा लढा सुरू आहे.परंतू सरकार धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भात जाणिव पुर्वक टाळाटाळ करीत आहे.हे धनगर समाजातील लोकांच्या लक्षात आले आहे.निवडनुका आल्या की सरकार धनगर समाजाला नसलेल्या योजनांचं गाजर दाखवून धनगर समाजाची मते खेचून घेऊन नंतर निवडूण आल्यावर या प्रश्नाला हेतूपुरस्कर बगल देत आहे.याच पार्श्वभूमीवर बीड मध्ये धनगर समाज बांधवांच्या प्रमुख समन्वयकाची चिंतन बैठक पार पडली.यामध्ये येणाऱ्या काही दिवसात धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळवण्या संदर्भात बीड जिल्ह्यामध्ये धनगर समाजाचे फार मोठे अधिवेशन घेण्यात येणार आहे.असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील धनगर समाजातील अनेक नेत्यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे गाजर दाखवून स्वतःची तुंबडी भरून घेतली आणि समाजाला वाऱ्यावर सोडून दिले आहे असे सांगण्यात आले.धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळवून देतो असे सांगणाऱ्या अनेक राजकीय पक्षांच्या दलालांनी धनगर समाजाला फसविले आहे.मराठ्यांचे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू होते.त्यांनी सरकारला हादरून सोडले होते.सरकारला जी आर काढण्यासही भाग पाडले होते.याला म्हणतात मराठा समाजाची एकजूट. मराठ्यांना देण्यात आलेला जी आर खरा की खोटा हे जाती आयोग आणि न्यायालय ठरवील.त्या संदर्भात आपल्याला भाष्य करायचे नाही. परंतु जेव्हा मराठा समाजाचे आंदोलन चालले तेव्हा धनगर समाजातील नेते मुग गिळून गप्प का बसले होते.असा सवाल या बैठकीत विचारण्यात आला होता.पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजातील नेत्यांनी धनगर समाजाला एका विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधून आता ही शेवटची लढाई आहे असे सांगून धनगर समाजाची फार मोठी फसवणूक केली आहे.धनगर समाजाचे नेते म्हणून घेणाऱ्या अनेक लबाड पुढाऱ्यांनी स्वतः ला राष्ट्रीय काँग्रेस,भाजप, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी,रासप, या पक्षाच्या दावणीला बांधून घेतले आहे.त्या पक्षाची झुल अंगावर पांघरून घेऊन नेतेगीरीचे सोंग घेवून आपले खिसे भरून घेतले आहेत.आणि समाजाला देशोधडीला लावले आहे.एका विशिष्ट पक्षाच्या नेत्यांकडून रसद घेऊन फेकलेल्या तुकड्यावर आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. अनेकांनी धनगर समाजाच्या तोंडाला आरक्षणाचे गाजर दाखवून पानेच पुसली आहेत.आणि समाजाला वेड्यात काढून वेठीस धरले आहे.ही खरी वस्तुस्थिती आहे.अनेक निवडणुकीत धनगर समाजाचा फक्त मतांसाठी वापरच करून घेतला जातो.निवडणूक काळात फसव्या घोषणा करून धनगर समाजाची मतांसाठी दिशाभूल केली जाते.हीच खरी शोकांतिका निर्माण झाली आहे.महाराष्ट्रात धनगर समाजातील मेंढपाळावर नेहमीच होणाऱ्या हल्ल्या बाबद कायदा करण्यासाठी कोणीही धनगर नेता महाराष्ट्र विधीमंडळात आवाज उठवत नाही.ज्यांनी कोणी चार सहा जणांनी वेगवेगळ्या पक्षाकडून आमदारकी, खासदारकी,मंत्री पदे मिळवली त्यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षणाचा न्याय देण्यासाठी पुरेसे प्रयत्न करायला पाहिजे होते ते केले नाहीत. अहिल्या नगर च्या विश्राम ग्रुहात धनगर समाजातील एका धनगर मंत्र्याला सर्व सामान्य धनगर समाजातील एका कार्यकर्त्यांनी असे विचारले होते की “नामदार मंत्री महोदय साहेब धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण कधी मिळणार” तर त्या धनगर समाजातील मंत्री महोदयांनी असं सांगितले होते की मी काही फक्त धनगर समाजाचा मंत्री नाही तर मी सर्व महाराष्ट्राचा मंत्री आहे.धनगर आरक्षाचा विषय काढायचा असेल तर “गेट आउट” “चालता हो”अशी जर धनगर समाजातील नेत्यांनी भाषा असेल तर धनगर समाजाची प्रगती कशी होईल.नंतर या लायक नसलेल्या नेत्याला लोकांनी पराभूत ही केलं.असे लायक नसलेले लोक मंत्री पदावर नियुक्त असतील तर धनगर समाजाला न्याय कधी मिळणार. “मुकी बिचारी कुणीही हाका” ही अवस्था धनगर समाजाची आज मितीला झालेली आहे.राजकिय पक्षांचे दलाल बाजूला सारून सर्व सामान्य माणसाला पूढे करून धनगर समाजाचा एस टी आरक्षणाचा लढा सुरू करण्यात येणार आहे.असे सर्वानुमते ठरले आहे. या बैठकीत धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे प्रमाणपत्र न देणाऱ्या सरकारच्या विरोधात अनेकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने धनगर समाज एसटी आरक्षणा संदर्भात योग्य ती भुमिका घेउन धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा असे आवाहन गणेश कोळेकर आणि लक्ष्मण मस्के यांनी केले आहे.या बैठकीस बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरकारने धनगर समाज आरक्षण बाजूला सारून ओबीसीचा लढा सुरू केला आहे.असेही यावेळी सांगण्यात आले आहे.