आमदार मोनिकाताई राजळे यांचे पिताश्री माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव पाटील डोणगावकर यांचे आज दुःखद निधन, अंत्यविधी उद्या सकाळी ११ वाजता डोणगावी
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव राजाराम डोणगावकर यांचे आज दिनांक ५ जुलै रोजी सकाळी ११वाजून ५० मिनिटांनी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.ते ८१ वर्षाचे होते.त्यांचा पार्थिव देह आज दिनांक ५ जुलै रोजी दुपारी २ ते ५, या वेळेत औरंगाबाद येथील प्लाॅट नंबर३७ ,विरंगुळा, सहकार नगर, छत्रपती संभाजी नगर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.आणि अंत्यविधी उद्या रविवार दिनांक ६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथे होणार आहे. स्व.अशोकराव राजाराम डोणगावकर हे भाजप शिवसेनेच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. ते गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे काही काळ अध्यक्ष ही होते. त्यांच्या पश्चात पत्नी गं.भा.कुसुमताई अशोकराव डोणगावकर,भाउ रमेश राजाराम डोणगावकर,मुले किरण अशोकराव डोणगावकर,राहुल अशोकराव डोणगावकर,विवाहित मुली,शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती मोनिकाताई राजीव राजळे,सौ.वैशालीताई कैलासराव सावंत,पुतणे मयुर रमेशराव डोणगावकर,सुनिल बाजीराव डोणगावकर, भालचंद्र विनायकराव डोणगावकर असा परीवार आहे.त्यांच्या अचानक जाण्याने राजळे, सावंत, डोणगावकर परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.