मुंगी येथे ३९,२२० रुपये किंमतीचा २५६ बाटल्यांचा अवैध दारू साठा शेवगाव पोलिसांकडून जप्त,आरोपी गजाआड

मुंगी येथे ३९,२२० रुपये किंमतीचा २५६ बाटल्यांचा अवैध दारू साठा शेवगाव पोलिसांकडून जप्त,आरोपी गजाआड

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम उघडून अहिल्यानगर जिल्ह्यात एक नवा वचक निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे.त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यातील ज्या तालुक्यातील पोलिस निरीक्षकाच्या हद्दीत अवैध धंदे आढळून येतील त्या तालुक्यातील पोलिस निरीक्षकावरच कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराच पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे ३९ हजार२२० रुपये किंमतीचा २५६ दारूच्या बाटल्यांचा अवैध दारू साठा शेवगाव पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या बाबत मिळालेली माहिती अशी की गुरुवार दिनांक ३ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे एक इसम बंद घराच्या आडोशाला बसून देशी विदेशी बनावटीच्या दारूची अवैध मार्गाने विक्री करीत आहे अशी बातमी शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांना एका खबऱ्या मार्फत मिळाली. या बाबतची खात्री करण्यासाठी मुटकुळे साहेब यांनी एक विशेष पोलीस पथक तयार करून ते मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे पाठवून दिले.पोलीस पथकाने तेथे जाऊन प्रत्यक्ष खात्री केली असता सदर ठिकाणी एक इसम बंद घराच्या आडोशाला बसून अवैध मार्गाने देशी विदेशी बनावटीच्या दारूची विक्री करीत असल्याचे दिसून आले. सदर ईसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्यानें त्यांचे नाव देवेंद्र मुंगाजी सोनटक्के (वय २७) राहणार मुंगी,तालुका शेवगाव,जिल्हा अहिल्यानगर असल्याचे सांगितले.त्याच्याकडे दारूविक्रीचा परवाना असल्या बाबत चौकशी केली असता त्याने दारू विक्रीचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले.मग सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्या कडे एकूण ३९ हजार २२० रूपये किमतीच्या देशी विदेशी कंपनीच्या एकुण २५६ बाटल्यांचा ढीग आढळून आला. मग सदर आरोपीच्या विरोधात शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल (बक्कल नंबर ५१०) एकनाथ अंबादास गर्कळ यांनी गुन्हा रजिस्टर नंबर ५८३/ २०२५ महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करून वरील गुन्ह्यातील मुद्देमाल शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक कलुबर्मे साहेब,शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब, पोलिस सब इन्स्पेक्टर बाजीराव सानप,पोलिस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे,पोलिस हेड कॉन्स्टेबल ईश्वर गर्जे, पोलिस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ,भगवान सानप, एकनाथ गर्कळ, प्रशांत आंधळे, ईश्वर बेरड यांनी केली आहे. यामुळे अनेक गावांतील अवैध धंदे करणारे आता पुन्हा जागा बदलूण हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो का याची चाचपणी करीत आहेत.