चाळीसगाव येथिल डाँ. माधवराव देवराम पंडित यांना “FELLOWSHIP IN PREVENTIVE CARDIOLOGY” पदव्युत्तर पदवी प्रदान
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक चा पदव्युत्तर पदवी चा पदविदान समारंभ
खोपोली जि. रायगड येथील माधवबाग हाँस्पिटल येथे काल जागतिक डाँक्टर्स डे दि. ०१ जुलै २०२५ रोजी , महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक, यांचा PREVENTIVE CARDIOLOGY ह्रदय रोग या विषया ची FELLOWSHIP ही अत्यंत मानाची समजली जाणारी पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्र व भारतातील ईतर राज्यातील डाँक्टरांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचे प्रतिनिधी व जगप्रसिद्ध ह्रुदय रोग तज्ञ व शल्यविशारद . मा. डाँ. चंद्रकांत चव्हाण सर यांच्या शुभहस्ते पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, मार्फत सुरू करण्यात आलेला FELLOWSHIP IN PREVENTIVE CARDIOLOGY या कोर्स मधे , ALOPATHY , AYURVED , HOMOEOPATHY, YOGIC SCIENCE व NATUROPATHY या , जगातील मान्यताप्राप्त वैद्यकिय उपचार प्रणालींचा संयुक्त व अतिशय प्रभावी असा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
भारतामध्ये ह्रदय रोगांच्या प्रमाणात दिवसेंदिवस लक्षणिय रित्या व झपाट्याने वाढ होत आहे. संपूर्ण जगातील ह्रदय रोग रूग्णांच्या आकडेवारी नुसार भारत सर्वोच्च स्थानी आहे.
पदविदान ( CONVOCATION CEREMONY ) समारंभाच्या या प्रसंगी भारतातील विविध राज्यांतील पात्र डाँक्टर्स सोबतच जळगाव जिल्ह्यातील , चाळीसगाव येथिल डाँ. माधवराव देवराम पंडित यांना , FELLOWSHIP IN PREVENTIVE CARDIOLOGY , ही पदव्युत्तर पदवी या कार्यक्रमात प्रदान करण्यात आली.
या बाबत डाँ. माधवराव पंडित यांच्याकडून अधिक माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, कोणत्याही रुग्णांवर उपचार करताना तो कोणत्या पँथीद्वारे केला याला महत्त्व नसून रूग्ण त्याच्या आजारातून पुर्ण व कायमस्वरूपी बरा झाला पाहिजे याला महत्व दिले पाहिजे, आणि त्याहीपेक्षा आजार होऊच नये म्हणून व्यक्ती ला आजार होण्याआधिच ( PREVENTIVE TREATMENT ) संभावित जोखमीची( RISK FACTOR S)वेळीच तपासणी प्रत्येकाने करून घेण्या साठी जनसामान्यांची जनजागृती करणे ही आपल्या देशात अतिशय महत्त्वाची गरज आहे. कारण सर्वसाधारणपणे आपल्या देशात आधुनिक औषधोपचाराकडे ( ALOPATHY – Modern Medicine ) जनतेचा कल जास्त आहे. अँलोपँथी म्हणजेच माँडर्न मेडिसीन डाँक्टर्स/ प्रँक्टीशनर्स( MBBS/MD/MS etc. ) हे एकतर PRVENTION म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजनां बाबत उदासीन असतात व/ किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधुनिक उपचार ( Modern Medicine System )पद्धतीमधे , प्रतिबंधात्मक उपचार ( Preventive Treatment ) व रोगाचे समुळ निवारण या साठी कोठलेही प्रयोजन नाही. म्हणून आजार मुळासकट बरा करणे व आजार होण्याआधिच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे यासाठी संयुक्त उपचार पद्धती ( Treatment with Holistic approach ) ही वर्तमान व भविष्य काळाची महत्त्वाची गरज आहे.ही गरज लक्षात घेऊन MUHS म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक ने RUBY HALL PUNE , V.R.T. SANE INSTITUTE OF PREVENTIVE CARDIOLOGY THANE व माधवबाग हाँस्पिटल, खोपोली यांच्या संयुक्त प्रयासाने ” FELLOWSHIP IN PREVENTIVE CARDIOLOGY ” हा अतिशय स्तुत्य असा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे.
डाँ. माधवराव पंडित यांनी पुढे सांगितले की, त्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे प्रस्तूत शोधनिबंध ( PROJECT/THESIS) या साठी त्यांना , प्रसिद्ध ह्रुदयरोगतज्ञ डाँ. जगदीश हिरेमठ सर , रूबी हाँल पुणे स्टाँफ , डाँ. मनिषा घुरडे, माधवबाग हाँस्पिटल स्टाँफ खोपोली या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.