कोपरे येथे विज पडून तिन शेळ्या दगावल्या, मेंढपाळ बालंबाल बचावला
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे वीज पडून तिन शेळ्या दगावल्या परंतु मेंढपाळ मात्र बालंबाल बचावला आहे.या बाबतची घटना अशी की कोपरे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील मेंढपाळ नामदेव बाबुराव आव्हाड हे पन्नास मेंढ्या आणि दहा शेळ्या असे एकूण साठ शेळ्या मेंढ्या रानात चरावयास घेऊन गेले होते.सोमवार दिनांक १९/५/२०२५ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जोरदार सोसाट्याच्या वारा आणि मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला असल्या कारणाने सर्व शेळ्या मेंढ्या बाभळीच्या झाडाखाली आडोशाला उभ्या राहिल्या होत्या.वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती.शेळ्या मेंढ्या सांभाळनारे नामदेव आव्हाड (वय ७५ वर्षे) म्हणाले की मी आणि शेळ्या मेंढ्या बाभळीच्या झाडाखाली आडोशाला उभे राहिले होतो.अचानक जोरदार आवाज झाला आणि आकाशात लख्ख प्रकाश पडला होता आणि त्याच वेळेस विजेचा गोळा आमच्या दिशेने आला आणि बाभळीच्या झाडावर जाऊन आदळला असता बाभळीच्या झाडाच्या खोडाची साल निघाली आणि तीन शेळ्यांना जोरदार झटका बसला असता त्या जागेवरच गतप्राण झाल्या.परंतू दैव बलवत्तर म्हणून मी मळगंगा देवी,भगवान बाबा आणि वामन भाऊंच्या पुण्याईने वाचलो अन्यथा माझी काही खैर नव्हती.माझ्या दिशेने काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून मी देवाचे आभार मानतो की त्यांनी मला जिवंत ठेवले असे आव्हाड यांनी सांगितले.ही माहिती समजताच हनुमान टाकळी गावचे कोतवाल शिवाजी जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून कामगार तलाठी यांना माहिती दिली.शासनाने या वयोवृद्ध मेंढपाळाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी त्यांच्या कुटुंबीयांनी मागणी केली आहे.