Home पाचोरा निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन

निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन

निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन..!

 

 

 

*पाचोरा* :-निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये *आंतर शालेय क्रीडा महोत्सव* अतिशय उत्साहात संपन्न झाला. यात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्यांचे प्रदर्शन केले.सदर महोत्सवात सुमारे 1300 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये रॉयल्स, लॉर्ड्स एम्परर, व किंग्स हाऊस अशा चार विभागात स्पर्धा खेळविण्यात आल्या. हा महोत्सव दि. 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. तत्पूर्वी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शाळेचे जनसंपर्क अधिकारी आय.बी.सिंग, प्राचार्य गणेश राजपूत, समन्वयक सौ. स्नेहल पाटील यांनी हवेत फुगे सोडून केले.

या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी,खो-खो,ॲथलेटिक्स, लांब उडी, उंच उडी,कॅरम, तसेच बुद्धिबळ इ. खेळांच्या स्पर्धा झाल्यात. सदर सामने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात तसेच खेळ भावनेने खेळविण्यात आल्या. कबड्डी व खो-खो च्या स्पर्धेत खेळाडूंमध्ये अतिशय चुरशीचे सामने रंगले. कबड्डीच्या स्पर्धा ह्या मॅटवर खेळविण्यात आल्यात. या तीन दिवसांमध्ये फक्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या महोत्सवाने खेळाडूंमध्ये सहकार्याची भावना निर्माण केली असून त्यांना पुढील मोठ्या स्पर्धांसाठी प्रेरणा मिळाली आहे.

याप्रसंगी शाळेचे जनसंपर्क अधिकारी आय.बी. सिंग, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, समन्वयक सौ.स्नेहल पाटील, क्रीडा विभाग प्रमुख श्री .गणेश मोरे, श्री नंदकिशोर पाटील, श्री वैभव हटकर, कु. नेहा देशमुख, श्री प्रवीण मोरे, श्री राहुल गाठे आदी उपस्थित होते. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Don`t copy text!