व्यक्तीमत्व विकासासाठी स्नेह संमेलन उपयुक्त डॉ.वाय.जी.पाटील

व्यक्तीमत्व विकासासाठी स्नेह संमेलन उपयुक्त
डॉ.वाय.जी.पाटील

नांद्रा जि.प.प्राथमिक विद्या मंदिर येथे स्नेह संमेलन उत्साहात
नांद्रा(ता.पाचोरा)ता.१४ विद्यार्थीच्या विविध कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजे शाळेचे स्नेहसंमेलन असत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी स्नेह संमेलन उपयुक्त असते.स्नेह संमेलनातील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी घडले जातात असे प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष डॉ वाय.जी.पाटील यांनी व्यक्त केले.
नांद्रा(ता.पाचोरा)येथील जि.प.प्राथमिक शाळेत झालेल्या स्नेह संमेलना प्रसंगी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ.वाय.जी.पाटील, उपसरपंच शिवाजी तावडे, बंटी सुर्यवंशी,माजी सरपंच विश्वंभर सुर्यवंशी, नितीन तावडे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वप्निल बाविस्कर, उपाध्यक्ष गणेश सुर्यवंशी,ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी, भाऊसाहेब बाविस्कर, राकेश साळवे,किरण सोनार, महेश गवादे, गजानन ठाकूर, विनोद बाविस्कर, पंकज बाविस्कर,प्रा. यशवंत पवार, इश्वर सातपुते, विकास खैरनार, मोहन सुर्यवंशी,किरण पाटील,नगराज पाटील, पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या सह पालक व महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते . शाळा डिजिटल करण्यासाठी लोकसहभाग देणाऱ्या दात्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यार्थींनी विविध गुणदर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मोहीनी पाटील, प्रतिभा पाटील,स्वाती पाटील, उर्मिला पाटील, स्मृती साबळे, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्य यांनी परीश्रम घेतले.