पाचोरा भडगाव तालुक्यातील IIT व NEET परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आमदार किशोर पाटील यांनी केले सन्मानित

पाचोरा भडगाव तालुक्यातील IIT व NEET परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आमदार किशोर पाटील यांनी केले सन्मानित

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा भडगाव तालुक्यातील JEE व NEET परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आमदार किशोर पाटील यांनी केले सन्मानित दिनांक २४ जून रोजी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कार्यालयात या विद्यार्थ्यांचा विशेष सत्काराच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनुक्रमे कृष्णा ईश्वर देशमुख, अथर्व प्रशांत पाटील, किरण संजय पाटील, अर्णव नितीन पाटील, तन्मय शरद माथूरवैश्य, सारिका प्रकाश पाटील, अनुजा गोपाल चौधरी, यश शशिकांत येवले, आकांक्षा नरेश गवांदे, अर्णवी चारुदत्त खानोरे या विद्यार्थ्यांचा विशेष सत्काराचा आयोजन करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांचा सत्कार तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला. प्रसंगी जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड येथील ज्येष्ठ शिक्षक पी एस भोसले यांना नुकताच निसर्ग मित्र संघटना धुळे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. म्हणून त्यांचा विशेष सत्कार तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला. यावेळी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करणारे प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत त्यांनी या विद्यार्थ्यांनी तालुक्याच्या नाव लौकिकात भर पाडली असे सांगितले व देश महासत्ता होईल किंवा नाही हे सांगता येत नाही परंतु गुणी विद्यार्थी परिवर्तन घडवून आणू शकतात असे त्यांनी सांगितले. शेवटी तालुक्याचे आमदार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनापासून अभिनंदन केले व आपल्या आरोग्याची देखील काळजी घेण्याचे विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. प्रसंगी प्राध्यापक चिंचोले सर, भडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, मार्गदर्शक नरेंद्र पाटील सर, पत्रकार प्रवीण ब्राह्मणे, आप्पांचे सहाय्यक राजेश पाटील,तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजू दादा पाटील यांनी विशेष परिश्रम घेऊन यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक तथा पत्रकार बी एन पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन विजय ठाकूर यांनी मानले.