गो.से.हायस्कुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

गो.से.हायस्कुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पा.ता.सह. शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कुल,पाचोरा या विद्यालयात तांत्रिक विभागाचे शालेय समिती चेअरमन मा. आण्णासाहेब श्री.वासुदेव महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे शालेय समिती चेअरमन मा. दादासाहेब श्री.खलील देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम वाघ मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील सर, पर्यवेक्षक श्री.आर.एल. पाटील सर, श्री.ए.बी.अहिरे सर, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस.एन.पाटील सर, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री.मनीष बाविस्कर सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आर.बी. तडवी सर, कार्यालयीन अधीक्षक श्री.अजय सिनकर, माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
संगीत शिक्षक श्री एस. डी.थोरात सर, श्री.रुपेश पाटील सर व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, तर श्री. महेश कौंडिण्य सर दिग्दर्शित पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले. समारंभाचे सूत्रसंचलन श्री.आर.बी.बोरसे सर व श्रीमती.एस.ए.पवार मॅडम यांनी केले.
सर्व विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला.