शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा PM SKILL RUN स्पर्धेचे आयोजन

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा PM SKILL RUN स्पर्धेचे आयोजन

 

कौशल्य विभाग, महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग आयोजित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा PM SKILL RUN स्पर्धेचे आयोजन पाचोरा शहरात दिनांक १७/०९/२०२३ रोजी
सकाळी ७:०० वा. आयोजित करण्यात आले आहे स्पर्धकांमध्ये महिला व पुरुष असे दोन गट असून प्रत्येक गटासाठी
प्रथम बक्षीस रुपये 3000
द्वितीय बक्षीस रुपये 2000 तृतीय बक्षीस रुपये 1000
असे वितरित करण्यात येणार आहेतरी धावपटूंना QR कोड स्कॅन करून सभासद नोंदणी करायची आहे
PM SKILL RUN मॅरेथॉन नियोजित मार्ग
स्पर्धेची सुरुवात छत्रपती राजे संभाजी महाराज चौक—छत्रपती शिवाजी महाराज चौक~जुना जामनेर रोड
कृष्णापुरी~ भारत डेअरी स्टॉप ~शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जुना सारोळा रोड पाचोरा येथे समाप्ती
होणार आहे तरी या स्पर्धेत सर्व धावपटूंनी QR कोड स्कॅन करून सभासद नोंदणी करावी व स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा प्राचार्य श्री. शिवकुमारजी जुमनाके सर व संस्थेचे प्रभारी गटनिर्देशक श्री. विलासजी भोळे सर यांनी केला आहे.