वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या प्रयत्नाने पक्ष्याला जिवदान

सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या प्रयत्नाने पक्ष्याला जिवदान

दिनांक 17 मे 2023 ला सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांना उपजिल्हा रुग्णालय परीसर वरोरा येथे जखमी अवस्थेत एक पक्षी दिसला. त्यांनी पक्ष्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण पक्षी उडाला.तरीही हार मानली नाही आणि पक्ष्याला पकडले‌ आणि त्याची जखम बघून वाटतं नव्हते की तो वाचेल.पण प्रयत्न करावे लागेल असे वाटले.आणी त्याला वाचवण्यात यश आले.डाॅ बुटोलीया, आणि डॉ जाधव यांनी त्यांचे टाके लावलें व ड्रेसिंग केले . ह्रदय दिसत होते फुफ्फुस दिसतं होते,घसा दिसत होता याहीपेक्षा जास्त पक्षी जखमी झाला होता.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका, डॉ बूटोलिया , डॉ जाधव,सौ सोनल दांडगे,आफरीन खान,समिर किन्नाके , अमोल भोग, बंडू पेटकर,दैशमुख मावशी या सर्व टिमच्या सहकार्याने हे शक्य झाले.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांच्या प्रयत्नाने त्या पक्ष्याला व सर्वांच्या सहकार्याने पक्ष्याला जिवदान मिळाले.त्याला सिरिंजच्या साह्याने आॅनटीबायोटिक्स,पेनकिलर औषध आणि तापाची औषध तसेच 25%ग्लुकोज देवून औषधोपचार करण्यात आले.अशीच सर्वांनी मिळून मिसळून कामं केलें तर सर्व शक्य होते.कोणी काहीही म्हणो आपण आपले कार्य चांगलें करत राहावे.पशू पक्षी हेही जिवच आहे. त्यांना वाचविने,त्याचि काळजी घेणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे कर्तव्य आहे.पशुप्राण्यावर प्रेम करावे असे म्हणतात पण तसे होतांना कमी दिसते..सर्व टिमचे धन्यवाद आणि नंतर पक्ष्यांवर उपचार झाल्यानंतर प्राणी,पशू पक्ष्यांच्या दवाखान्यात जबाबदार व्यक्ती कळे पूढील उपचारासाठी दाखल करण्यात आले .