चोपडा महाविद्यालयात पदार्थविज्ञान विभागातर्फे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा

चोपडा महाविद्यालयात पदार्थविज्ञान विभागातर्फे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागातर्फे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सुर्यवंशी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी तसेच पदार्थविज्ञान विभागाच्या विभागप्रमुख डॉ. प्रिती रावतोळे, डॉ. व्ही. आर. हुसे, डॉ. बी. एम. सपकाळ, डॉ. एल. बी. पटले, गोपाल वाघ, जितेन धोबी, प्राजक्ता वानखेडे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. प्रिती रावतोळे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा २८ फेब्रुवारी रोजीच का साजरा केला जातो? याचे महत्व विषद केले.
यावेळी त्यांनी रमण ईफेक्ट चा उपयोग कुठे व कसा होतो? याची माहीती डॉ. व्ही.आर. हुसे यांनी दिली. तसेच डॉ. बी. एम. सपकाळ यानी रसायन शास्त्रामध्ये रमण ईफेक्ट चा वापर कसा केला जातो? याची सविस्तर माहीती दिली. त्याचप्रमाणे डॉ. एल बी पटले यांनी विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानीक दृष्टीकोन अंगीकारणे कसे गरजेचे आहे हे स्पष्ट केले. त्यानंतर मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. ए. एल. चौधरी यांनी विद्यार्थ्यानी संशोधक वृती जोपासावी, ज्याने विज्ञान संशोधनास चालना मिळेल असे मत मांडले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार निरजंन पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश भाट, विशाल पाटील व जितेंद्र कोळी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थीत होते.