जिल्हास्तरीय स्केटींग व रायफल शुटींग स्पर्धेत किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे श्रध्दा,भुनेश व गणेश प्रथमस्थानी

जिल्हास्तरीय स्केटींग व रायफल शुटींग स्पर्धेत किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे श्रध्दा,भुनेश व गणेश प्रथमस्थानी…!!!!!!

भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे खेळाडू व न्यू इंग्लिश मेडियम स्कूल,बाळद रोड,भडगावचे विद्यार्थी कु.श्रध्दा बापुराव पाटील (१४ वर्षाआतील मुली),चि.भुनेश सचिन पाटील (११ वर्षाआतील मुले) यांनी एकलव्य क्रीडा संकुल,स्केटींग कोर्ट,जळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय स्पीड स्केटींग स्पर्धेत प्रथम येत तसेच पायोनिअर स्पोर्ट्स क्लब,जळगाव येथे १४ वर्षाआतील १० मीटर एअर पिस्टल प्रकारात चि.गणेश सचिन पाटील यानेही जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम येत नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्याबद्दल तिन्ही खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक नानासाहेब प्रतापराव पाटील,दुध फेडरेशनच्या संचालिका डाॕ.पुनमताई पाटील,मंत्रालयातील उपसचिव प्रशांतराव पाटील,यांच्या हस्ते शाल,बुके व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेत यशस्वी खेळाडूंना किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे राष्ट्रीय स्केटींग प्रशिक्षक सुनिल मोरे,रायफल शुटींगचे माजी राष्ट्रीय खेळाडू सचिन पाटील,आदर्श क्रीडा शिक्षक प्रा.सतीश पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी,आतिक सातोटे आदिंचे मार्गदर्शन लाभले.
श्रध्दा,भुनेश व गणेशच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,प्राचार्या विद्या पवार,सुरेशजी गुजेला आदिंनी आनंद व्यक्त करीत,अभिनंदन केले आहे तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.