श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे 1तारीख 1तास श्रमदान या उपक्रमाचे आयोजन संपन्न

श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे 1तारीख 1तास श्रमदान या उपक्रमाचे आयोजन संपन्न

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल,पाचोरा येथे आज दि.1आक्टोबर रविवार रोजी शासनाच्या निर्देशानुसार 1तारीख 1तास श्रमदान या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी श्री. समाधान पाटील साहेब,केंद्रप्रमुख श्री. अभिजीत खैरनार सर, मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. एन. आर.ठाकरे सर, पर्यवेक्षक श्री. आर.एल.पाटील सर, श्री.ए.बी. अहिरे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आर.बी. तडवी सर, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस. एन.पाटील सर, कार्यालयीन प्रमुख श्री.अजय सिनकर व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू,भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.. याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ.वाघ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छता व त्याचा मानवी आरोग्यावर होणारा चांगला परिणाम याचे महत्त्व समजावून सांगितले.
. सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शालेय इमारत व शालेय परिसराची चांगल्या प्रकारे स्वच्छता करण्यात आली. श्रमदान झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून मान्यवरांच्या हस्ते बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी श्री. समाधान पाटील साहेब व केंद्रप्रमुख श्री.अभिजीत खैरनार सर यांनी शालेय प्रशासनाचे कौतुक केले.