एसएससी बोर्ड परीक्षेच्या पार्श्र्वभूमीवर नवजीवन विद्यालयात केंद्र संचालक व रनर सभा संपन्न

एसएससी बोर्ड परीक्षेच्या पार्श्र्वभूमीवर नवजीवन विद्यालयात केंद्र संचालक व रनर सभा संपन्न

नवजीवन विद्यालय पाचोरा येथे एसएससी बोर्ड मार्च २०२२ परीक्षेसाठी संबंधित शाळांचे केंद्र संचालक व रनर सभा संपन्न झाली. मुख्य केंद्र संचालक एस बी पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली सभेत दहावी बोर्ड परीक्षेसंदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन करत चर्चा करण्यात आली. केंद्र क्रमांक ‘३५०५ ब’ केंद्रात नऊ शाळांचा समावेश होत असून या शाळांची परीक्षा ३५०५ ब केंद्राअंतर्गत संपन्न होणार आहे. यात प्रत्येक शाळेत परीक्षा पार पाडण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. बोर्डामार्फत दिलेल्या सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, कोरोणा संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करणे, परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पध्दतीने पार पाडणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रसंगी नवजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक व मुख्य केंद्र संचालक एस बी पवार सर यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची भीती मनात न ठेवता कोरोणा नियमांचे पालन करून परीक्षेस सामोरे जाण्याचे आवाहन केले. यासोबतच पी के शिंदे शाळेचे मुख्याध्यापक गीते सर, नवजीवन विद्यालयाचे उपकेंद्र संचालक एस ए पाटील व प्रमोद पाटील यांनी सूचना मांडत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवून आणली.