महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटने तर्फे आंदोलन

महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटने तर्फे आंदोलन

 

महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे जळगाव विभागीय कार्यालयाचे प्रशासन ने वार्षिक सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यात आली असताना त्यामध्ये अनियमितता झाली आहे त्या बद्दल जाब विचारण्यासाठी संघटनेचे विभागीय, सर्कल व परिमंडळ शाखेच्या वतीने सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार करून चौकशी समिती चे अहवाल चे अधीन राहून तूर्तास स्थगित करण्यात आले होते ते आंदोलन आजपासून सुरू करण्यात आले आहे.सदर प्रकरणात प्रशासनाने अनेक चुकीच्या पद्धतीने केलेल्या बदली प्रक्रियेत जळगाव मंडळ कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ ज्येष्ठता यादी फायनल झाल्यावर जळगाव विभाग मधील कर्मचारी यांचे नाव अद्ययावत आहे त्या यादीत असलेल्या नावाचे निरिक्षण केले असता असं स्पष्ट होते आहे की जळगाव विभाग कार्यालय ने ज्येष्ठता क्रम न अवलंबता यादी मध्ये खाली असलेल्या उमेदवारांना लॉंग टेन्यूअर म्हणून चुकीचे पध्दतीने बदली पदस्थापना करण्यात आली आहे तरी प्रशासन आपली अक्षम्य चूक मान्य करण्यास तयार नाही.उलट संघटनेचे सहभागी सभासद पदाधिकारी यांना आपली शिफ्ट ड्यूटी असली तरी हजेरी तपासणी करून गैरहजेरी लावण्यात येईल अशी धमकी देऊन प्रशासन सनदशीर मार्गाने सुरू असलेल्या आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे.गेल्या जून महिन्यात बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात संघटनेचे वतीने संभाव्य परिणाम बाबतीत गांभीर्याने अवगत करण्यात आले होते परंतु प्रशासन ने जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे असे वाटते.म्हणून संघटनेचे वतीने सदर आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे
विरेंद्रसिंग पाटील परिमंडळ सचिव जळगाव तथा राज्य संयुक्त सचिव महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन, देविदास सपकाळे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा परिमंडळ प्रसिद्धी प्रमुख, प्रकाश कोळी सर्कल अध्यक्ष तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, दिनेश बडगुजर सर्कल सेक्रेटरी, प्रभाकर महाजन विभागीय अध्यक्ष,किशोर जगताप विभागीय सचिव जळगाव
सभासद पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला