कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा.
भौतिक शास्त्र विभाग व सायन्स असोसिएशन तर्फे दिनांक 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आय.क्यू.ए.सी.चेअरमन व रसायन विभाग शास्त्राचे प्रमुख प्रा. संदीप पालखे, प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.श्रीपाद उपासनी, विभागाचे प्रमुख डॉ. दीपक बोंडे, वनस्पती विभागाचे प्रा.डी.बी. चव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजीत जोशी  यांनी केले. याप्रसंगी डॉ. उपासनी यांनी विज्ञान दिन का साजरा केला जातो याचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन विशद केले. प्रा. संदीप पालखे यांनी 2024 हे वर्ष आदिवासी तंत्रज्ञानाचा भारतासाठी उपयोग या थीम वर आधारित आहे. डॉ.दीपक बोंडे यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. डी बी चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी द्वितीय वर्ष विज्ञान विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.