चोपडा महाविद्यालयात ‘Gender Sensitization’ या विषयावर पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न

चोपडा महाविद्यालयात ‘Gender Sensitization’ या विषयावर पोस्टर सादरीकरण स्पर्धा संपन्न

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय व युवती सभेअंतर्गत ‘Gender sensitization’ या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन दि.२५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल चौधरी, उपप्राचार्य श्री.एन. एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, स्पर्धेचे परीक्षक श्री.डी.एस.पाटील डॉ. के.एस.भावसार, डॉ.सौ. पी.एम.रावतोळे, डॉ.बी.एम सपकाळ, डॉ.एस.आर. पाटील, श्री.एस.बी.पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सौ.पी.एम. रावतोळे यांनी केले.
या स्पर्धेत ४२ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता. याप्रसंगी ३२ पोस्टर्सचे सादरीकरण करून विविध अंगांनी या विषयांना उजाळा दिला. याप्रसंगी मान्यवर व परीक्षक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून ही संकल्पना समाजात कशी रुजवता येईल तसेच स्वत: मध्ये कशी अंगीकारता येईल याविषयी मते व्यक्त केली.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कोळी विकास घवरलाल या विद्यार्थ्याने प्राप्त केले.द्वितीय पारितोषिक पाटील अपूर्वा पवन हिने तृतीय पारितोषिक सोनवणे चारुशीला शरद व पाटील विनिता भैय्यासाहेब या विद्यार्थिनींच्या ग्रुपने प्राप्त केले तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक वाघ पूजा व शोएब राजू तडवी यांना विभागून देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभ व समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, स्पर्धेचे परीक्षक श्री. डी.एस.पाटील व डॉ.सौ.पी. एम.रावतोळे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. त्याप्रसंगी अपूर्वा पवन पाटील व शोएब राजू तडवी या विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्पर्धेचे परीक्षक श्री.डी.एस.पाटील यांनी पोस्टर सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सादरीकरणात क
कशा पद्धतीने नावीन्य आणता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर उपप्राचार्य प्रा.डॉ.ए. एल.चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, सादरीकरण हे पहिलं पाऊल आहे. विद्यार्थ्यानी Gender sensitization ही संकल्पना काय आहे हे समजून घ्यावे व त्याचा अंगीकार करावा.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.के.एस.भावसार यांनी केले तर आभार डॉ.सौ.पी.एम. रावतोळे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.गोपाल डी. वाघ, श्री.निरंजन एन. पाटील, कु. प्राजक्ता वानखेडे, श्री. नीलेश भाट व जितेंद्र कोळी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.