पाचोऱ्यातील तरुणाची समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज;जवान वैभव पाटील यांचा आ.किशोर अप्पा पाटील यांनी गौरवले

पाचोऱ्यातील तरुणाची समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज;जवान वैभव पाटील यांचा आ.किशोर अप्पा पाटील यांनी गौरवले

पाचोरा(वार्ताहर)दि,२६
नुकत्याच मुंबई मध्य आलेल्या तैक्ती वादळामुळे खवळलेल्या समुद्रातील उसळणाऱ्या लाटाशी कडवी झुंज देत पाचोरा येथे आपल्या मूळगावी सुखरूप परतलेल्या पाचोरा येथील गोविंदनगरी भागातील रहिवासी व मुंबई येथील मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत असलेला जवान वैभव पाटील याचा हृद्य सत्कार आमदार किशोर अप्पा पाटील यांनी ‘शिवालय’ निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात केला केला. यावेळी वैभव पाटील यांनी समुद्रात सुमारे आठ तास जीवघेण्या लाटांशी दिलेल्या अनुभवाची शौर्य गाथा कथन केली.तर आ.किशोर अप्पा पाटील यांनी त्यास पुढील निर्विघ्न आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पाचोरा येथील माधवराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा वैभव हा गेल्या काही वर्षांपासून मुंबई येथील मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला मुंबई येथे नियुक्ती मिळाली. तौक्ते चक्रीवादळ मुंबईवर धडकले. त्यावेळी वैभव समुद्रात जहाजावर कार्यरत होता.समुद्रात उसळलेल्या प्रचंड लाटांमुळे वैभव व त्याचे सहकारी असलेले जहाज बुडाले. त्या वेळी त्याने हिंमत न हारता जिद्दीने समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज दिली. अशावेळी इंडियन नेव्हीचे मदतीसाठीचे जहाज वैभवपर्यंत पोहोचले. समुद्रात अक्षरशः मृत्यूशी झुंज देत असलेल्या वैभवने विशिष्ट प्रकारच्या खाणाखुणा करत मदतीसाठी आलेल्या इंडियन नेव्हीच्या जहाजास आपल्याजवळ बोलवल्यानंतर त्यास समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास सुनील शिनकर, माधवराव पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील ,शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाययक राजेश पाटील,प्रवीण पाटील यांची उपस्थिती होती.