पाचोऱ्यात आशिर्वाद ड्रिम सिटी मध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष; निवेदन देऊनही कोणतीही दखल नाही;कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्य धोक्यात!

पाचोऱ्यात आशिर्वाद ड्रिम सिटी मध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष; निवेदन देऊनही कोणतीही दखल नाही;कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्य धोक्यात!

पाचोरा शहरात असलेलं आशिर्वाद ड्रिंम सिटी मध्ये नागरिक हैराण असुन नगरपालिका निवेदन देऊन ही काम होत नाही तसेच नगरसेवक ही लक्ष देत नसुन नागरिक हैराण झाले आहेत हया भागातील नालीचे पाणी रस्ता वर वाहून येत आहे तसेच ते पाणी घरात जाऊन घाण होऊन मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी होत असून परिसरातील नागरिकांना कोरोनाचा काळात अश्या प्रकारचा त्रास सहन करावा लागतोय पाचोरा नगरपालिकेत एक वर्ष पहिले नागरिकांनी अर्ज दिला होता तरी देखील नगरपालिका लक्ष देत नाही म्हणून नागरिकांना मनस्ताप होतोय जर नगरपालिका लक्ष देणार नाही तर सर्व नागरिक मिळुन मा.आमदार किशोर आप्पा पाटील यांना भेटुन नगरपालिकेचा भोंगळ कारभाराबदल महिती देणार असून अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या भागातील नगरसेवक आणी राजकीय नेते मंडळी फक्त मतदान चा वेळ दिसून येतात आणी मतदान झालं की कोणीही पुकारा घेत नाही याबाबत लोकसेवक नगरसेवक यांच्या मध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.