इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, दि.१४ जुलै (जिमाका) -महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने इतर मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत मंजूर केलेल्या २० लाखापर्यंत कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून दिला जातो. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनाचा उद्देश आहे.

*योजनेचे स्वरुप :-* राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी कर्ज मर्यादा १० लाख रूपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी कर्ज मर्यादा २० लाख रूपये आहे.

*लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी व शर्ती :-* अर्जदाराचे वय १७ ते ३० वर्षे असावे. तो इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता ८ लाखापर्यंत असावे. अर्जदार इयत्ता १२ वी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी ६० टक्के गुणांसह पदविका उत्तीर्ण असावेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान ६० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा. केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरीता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र आहेत.

बँकेने मंजूर केलेली संपूर्ण कर्ज रक्क्म अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहील. परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर ५०० पेक्षा जास्त असावा.

*कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे :-* अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला, तहसिलदार यांचा उत्पनाचा दाखला, तहसिलदार यांचा महाराष्ट्र रहिवाशी (वय अधिवास) दाखला, अर्जदार अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड, ज्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परिक्षा उतीर्ण गुणपत्रिका. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्टा फोटो, अर्जदाराचा जन्माचा/ वयाचा पुरावा, शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र, शिष्यवृती (Scholarship), शैक्षणिक शुल्क माफी (Freeship) पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा, आधार संलग्न बैंक खाते पुराबा, तसेच इतर आवश्यक कागदपत्रे / पुरावे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा, आधार संलग्न बॅक खाते पुरावा, तसेच इतर आवश्यक कागदपत्रे/ पुरावे शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत येणारे अभ्यासक्रम

*राज्यातर्गत येणारे अभ्यासक्रम :- आरोग्य विज्ञान :-* एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस,बीएचएम, बी-फॉर्मसी व संबधीत विषयांतील सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम.

*अभियांत्रिकी :-* बीई, बी-टेक,बी-आर्किटेक्चर (सर्व शाखा) तसेच संबधीत विषयातील सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम.

*व्यावसायिक अभ्यासक्रम :-* एलएलबी हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बॅचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, पायलट सनदी लेखापाल, एमबीए, एमसीए, सिपींग, विषयातील पदवी व पदवीधर अभ्यासक्रम इत्यादी.

*कृषी अन्नप्रक्रीया व पशुविज्ञान :-* एनिमल ॲण्ड फिशरी सायन्सेस,बी-टेक, बॅचलर ऑफ व्हेटनरी सायन्स, बॅचलर ऑफ सायन्स या विषयातील सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम.

*देशांतर्गत अभ्यासक्रम :-* केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद शासकीय अनुदानित खाजगी मान्यताप्राप्त नॅक अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षा उतीर्ण झालेले प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता आहे. यात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान या आभ्यासक्रमाचा समावेश आहे.

*परदेशी अभ्यासक्रम :-* आरोग्य विज्ञान, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट अभ्यासक्रम व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमीत परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या रक्कमेचा परतावा (कमाल १२ टक्के पर्यंत) महामंडळ अदा करेल. तसेच व्याज परतावासाठी जास्तीत जास्त ५ वर्ष कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.

*कार्यपध्दती :-* सदर योजना पुर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जावून भरावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या खालील पत्यावर अथवा महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट दयावी

*कार्यालयाचा पत्ता -* डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरा समोर, महाबळ रोड, जळगाव ४२५००१ दुरध्वनी क्र. ०२५७-२२६१९१८ वेबसाईट :- www.msobcfdc.in अर्ज करण्याकरता या संकेतस्थळाला भेट दयावी.