मांडवे येथे सोलर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून मोबाईल हिसकावून घेऊन प्लॅंटची तोडफोड करणाऱ्या पाच आरोपींना (बाराच्या भावात) पोलिस कोठडी
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना आवादा कंपनीच्या खंडणीच्या प्रकरणावरून चांगलीच जेलची हवा खावी लागली आहे.अगदी तसाच प्रकार अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे या गावात घडला आहे.यातील बाराच्या भावात गेलेल्या पाच आरोपींना बारा ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या बाबतची माहिती अशी की अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे “बोंडडा इंजिनिअरींग लिमिटेड हैद्राबाद” या कंपनी मार्फत सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या सोलर प्लॅंटचे काम सुरू आहे.दिनांक ८ऑगष्ट २०२५ रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांच्या सुमारास, व त्याच दिवशी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास, दिनांक ९ ऑगष्ट २०२५ रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान वरील ठिकाणी फिर्यादी नोकरी करीत असलेल्या कंपनीचे चालू असलेले सोलर प्रोजेक्टचे काम यातील आरोपी नंबर १) महेश मच्छिंद्र लवांडे,२)शंकर भाऊसाहेब बर्डे,३) अप्पासाहेब श्रीपती लवांडे,४) महेश संभाजी बर्डे,५) सागर अरुण बर्डे,६) अक्षय बबनराव लवांडे यांनी आणि आनखी अनोळखी पाच इसम यांनी सदर फिर्यादी तसेच कंपनीचे कामगार यांना तुम्ही काम बंद करून येथुन निघून जा अशी दमदाटी करून,शिविगाळ आणि मारहाण करून कंपनीचे वाचमन मिलिंद पाटील,आणि मयुर बाबासाहेब डोईफोडे यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ आणि दमदाटी करून तसेच लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण करून त्यांचें वापरते मोबाईल व तीन प्लॅस्टिकच्या खुर्च्या चोरून नेल्या आहेत.तसेच साईटवर असलेल्या ट्रॅक्टरची आणि कॉंक्रीटर मिक्शचर यांची तोडफोड करून नुकसान केले आहे.वगैरे मजकूर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ८५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १८९(२),१९०, १९१(२), ११९(१),११५(२),३२४(४),३५१(२),३५२ प्रमाणे दिनांक ९ऑगष्ट २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी नंबर १) महेश मच्छिंद्र लवांडे,२)शंकर भाऊसाहेब बर्डे, ३)अप्पासाहेब श्रीपती गावडे,४)महेश संभाजी बर्डे,५)सागर अरुण बर्डे,सर्व राहणार मांडवे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांना पाथर्डी पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेचच ताब्यात घेऊन अटक केली आहे.सदर आरोपीला पाथर्डी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना बारा ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी दिलेली आहे.सदर गुन्ह्याचा तपास पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस उपनिरीक्षक संदिप ढाकणे हे करीत आहेत.सदर आरोपीच्या अटकेची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेले श्रीरामपूर विभागाचे विभागीय पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे,पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन दराडे,अभयसींह लबडे, पोलिस नाईक सुखदेव धोत्रे,वडते, संजय जाधव,शाम बनकर,सागर बुधवंत यांच्या पथकाने केली आहे.मांडवे हे गुन्हेगारी जगतात चांगलेच आघाडीवर असलेले गाव आहे.खून, मारामाऱ्या,शालेय विद्यार्थीनीवरील बलात्कार,शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी,हाॅटेलमध्ये मारामाऱ्या,शेत रस्ते, पाणंद रस्ते,शिवरस्ते, यावरून होणाऱ्या पोलिस केसेस,अवैध दारू,गांजा, विक्री, जुगार,मटका,गायरान जमिनीवरील अतिक्रमणे,जंगली वंण्य प्राण्यांच्या शिकारी, भुरट्या चोऱ्यां,रस्त्यावरील लुटमारी या कारणांमुळे चांगलेच चर्चेत आलेले गाव आहे. गाव तसं चांगलं पण वेशिला टांगल असं म्हणण्याची वेळ या गावावर आली आहे.कारण गावात घडत असलेल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटनामुळे गाव बदनामीच्या वाटेने वाटचाल करीत आहे असे दिसून येते.साम,दाम,दंड,भेद या कुटनितीचा सर्रास वापर होताना दिसत आहे.