के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात पाचव्या दिवसाच्या गणरायाला निरोप
के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात पाचव्या दिवसाच्या गणरायाला निरोप : के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात पाच दिवसाच्या गणरायाला अतिशय उत्साहाने भक्तिमय वातावरणात आणि सवाद्य निरोप देण्यात आला .सुरुवातीला अतिशय मनोभावे शासकीय पॉलीटेकनिक प्राचार्य डॉ पराग पाटील यांचे हस्ते आरती करण्यात आलीत. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी ,अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा विखार ,सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी विद्याथी उपस्थित होते. गणरायाला निरोप देते वेळी मिरवणुकी मध्ये लेझीम वाद्य ने विद्यार्थ्यांची व परिसरातील गणेश भक्तांची मने जिंकली . गणेश मूर्तीचे विसर्जन मेहरूण तलाव येथे करण्यात आले . गणपती स्थापने पासून तर विसर्जन पर्यंत प्रा सचिन नाथ व विद्यार्थी याचे सहकार्य लाभले .