पाचोरा भुयारी मार्गा जवळ वळण घेतांना एसटी बसचा मागील भाग दुभाजकला धडकला

पाचोरा भुयारी मार्गा जवळ वळण घेतांना एसटी बसचा मागील भाग दुभाजकला धडकला

पाचोरा नगरपालिका व पोलीस प्रशासनाने देखील कुठलीही दुर्घटनेची वाट न पाहता रस्त्यावरील भुयारी पुला पासुन ते कॉलेज ते छ.संभाजी राजे चौफुली पर्यंत अतिक्रमणात असलेल्या दुकाने हटवावे & एस टी बसचा मार्ग बदलण्याची गरज

पाचोरा,
एरंडोल कडून पाचोरा येणारी एसटी बस क्रमांक MH 06 S 8623 पाचोरा शहरात प्रवेश करत असतांना गिरडरोड कडुन भडगाव रोडचा दिशेने भुयारी मार्गाच्या जवळ चौकात वळण घेतांना बसचा मागील भाग रस्त्याच्या दुभाजक ला धडकली हि घटना घडल्यानंतर एसटी बस चालकाने प्रवाश्यांना बस मध्येच बसवुन बस मागे पुढे घेत बस काढण्याच्या प्रयत्न केला.
दरम्यान याठिकाणी बस अडकल्यामुळे काहीवेळेसाठी ट्रॉफिक जाम झाली होती.
यावेळी बस दुभाजकास घसरल्याने कर्कश आवाज आल्याने तेथील नागरिकांनी एसटी बस कडे धाव घेतली.सुदैवाने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही काहीवेळा नंतर एसटी बस चालकाने पुढे मार्गस्थ केली.
एसटी बस चालकास विचारले असता त्यांनी सांगितले की रस्ता च्या कडेला विक्रेत्याच्या दुकानींसमोर वाहने लावलेल्या असल्यामुळे बसला वळण घेण्यास अडचण आल्याने एसटी बस चा मागील भाग दुभाजक ला घसरला. ही बाब सत्य असली तरी गिरड मार्गाने येणार्‍या – जाणाऱ्या बसेसचा मार्ग देखील रिगरोड मार्गे ध्येय अँकेडमी – गो से हायस्कुल केला तर बऱ्यापैकी एस टी वाहन चालकांची अडचण दुर होईल शिवाय विद्यार्थ्यांची वर्दळ लक्षात घेता गो से हायस्कूल लगत थांबा न ठेवा तो थांबा जुन्या पाण्याच्या टाकी जवळ ठेवला तर सर्वाना सोईचे होईल
तसेच पाचोरा नगरपालिका व पोलीस प्रशासनाने देखील कुठलीही दुर्घटनेची वाट न पाहता रस्त्यावरील भुयारी पुला पासुन ते कॉलेज ते छ.संभाजी राजे चौफुली पर्यंत अतिक्रमणात असलेल्या दुकाने हटवावे विशेषतः अधिकृत भाजी मार्केट असतांना एखादी तात्पुरता टोपली ठिक आहे परंतु थेट रोडावरच भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत निरामय हॉस्पीटल समोरील श्रेयस हॉस्पीटलच्या लगत कॉर्नरवर रोडावरच भाजी विक्रेत्यांनी चक्क दुकानी थाटल्याने तेथे भाजी घेणारे ग्राहक रोडावरच गाडी लावत असल्याने चार चाकी वाहनास जाण्यासाठी अनेक वेळा अडचणीचे ठरते शिवाय भुयारीपुला लगत लोढाया यांच्या जिनींगच्या बाजुने तर थेट फिरते वाहन विक्रेते व नारळ विक्रेते थांबल्याने तेथे सुद्धा नेहमी रहजदारीस मोठ्या प्रमाणावर अडथळा होतांना दिसतो & एस टी अपघात सुद्धा त्याच ठिकाणी झाला आहे तरी पाचोरा न पा प्रशासन व पोलिस प्रशासनाने दखल घेऊन रस्त्याच्या श्वास मोकळा करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.