प्रकाश रामदास तेली यांच्या “वोट-3” काव्य संग्रहाचे केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते प्रकाशन

प्रकाश रामदास तेली यांच्या “वोट-3” काव्य संग्रहाचे केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते प्रकाशन

जळगाव :- पत्रकार कवी  लेखक प्रकाश रामदास तेली यांनी लिहिलेल्या वोट-3 हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले प्रकाश तेली यांनी मतदान जनजागृती साठीमतदानाचे महत्व लक्ष्यात आणून देण्यासाठीतसेच लोकशाहीला सुदृढ़ व मजबूत करण्यासाठी मतदानावर 200 कविता व 700 पेक्षा जास्त घोषवाक्य (कोट्सहे लिहिलेले आहेत वोट-3 काव्यसंग्रहात मतदानावर 50 कविता असून प्रत्येक कवितेचे वेगळे असे वैशिष्ट आहे

 प्रकाश तेली यांच्या नावावर मतदानावर सर्वाधिक कविता व घोषवाक्य लिहिण्याचा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे एकाच विषयावर इतक्या कविता व घोषवाक्य आजपर्यंत कोणीही लिहिलेले आढळून आलेले नाही प्रकाश तेली यांचे आतापर्यंत मतदान/वोट ह्या विषयावर वोट आणि वोट -2 हे काव्य संग्रह प्रकशित झालेले असून लवकरच वोट  4 वाचकांकरिता आणणार असल्याचे ही त्यांनी सांगितले त्यांचे बालविवाहसड़क सुरक्षाबढ़ती जनसंख्या, किसान, नदी भारत की जलधारा हे काव्य संग्रह प्रकाशित झालेले असून लवकरच “खाद्य सुरक्षा” काव्य संग्रहाचे प्रकशन होणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रकाश तेली भविष्यात वोट के कोट्स हे पुस्तके सुद्धा वाचकांकरिता आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

केंद्रीय कायदा मंत्री यांच्या कडून सर्व वोट काव्य संग्रहाचे कौतुक :-

मतदाना सारख्या अत्यंत महत्वपूर्ण व संवेदनशील विषयावर लिखाण केल्याबद्दल केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी प्रकाश तेली यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचलिकारिता  शुभेच्छा  दिल्या

प्रकाश तेली यांच्या वोट – 3 काव्य संग्रहाचे पासपोर्ट मैन ज्ञानेश्वर मुळे यांनी शुभेच्या संदेशाच्या माध्यमातून कौतुक केले आहे त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की वोट3 काव्य संग्रह हा मतदानाचे महत्व सांगणारमतदान जनजागृती करणारा व मतदार जनजागृती अभियानास हातभार लावणारा आहे हा काव्य संग्रह सकारात्मक व दूरगामी परिणाम करणारा असून यात निवडणूक कर्मचारी यांचा संघर्ष देखील स्पष्टपणे दिसतो असे त्यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

 

प्रकाश तेली यांनी लिहिले 5000 पेक्षा जास्त कविता व 6000 पेक्षा जास्त घोषवाक्य 

प्रकाश रामदास तेली यांनी विविध सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर 5000 पेक्षा जास्त कविता व 6000 पेक्षा जास्त सामाजिक कोट्स लिहिलेले आहेत कविता व कोट्स लिहून समाजाला जागृत करण्याचे अनोखे कार्य प्रकाश तेली हे करीत आहेत 

अनेक मान्यवरांकाडून प्रकाश तेली यांच्या काव्याचे कौतुक:-

प्रकाश तेली यांच्या लेखन कार्याचे माजी उपराष्ट्रपतीमाजी राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपद्मश्री भालचंद्र नेमाडेयांच्या सह अनेक केंद्रीय व राज्यमंत्रीतसेच अनेक अधिकारी व पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.