जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पूर्वा पाटील चे दुहेरी विजेतेपद

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पूर्वा पाटील चे दुहेरी विजेतेपद

पाचोरा -(प्रतिनिधी) खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पाचोर्‍याच्या पूर्वा किशोर पाटील हिने 15 व 17 वर्ष या दोन्ही वयोगटात विजेतेपद पटकावून पुन्हा एकदा जिल्ह्यातील बॅडमिंटन विश्वात आपली चुणूक दाखवून दिली आहे.

जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आयोजित जैन स्पोर्ट्स जळगाव आणि खासदार उमेशदादा पाटील मित्र मंडळ यांच्या सहकार्याने आज दिनांक 25 जून रोजी चाळीसगाव येथे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

वय 11 वर्ष, 15 वर्ष , 17 वर्ष 19, वर्ष व 35 वर्ष वयोगटातील बॅडमिंटनपटूंसाठी पर्वणी ठरलेल्या या स्पर्धेत पाचोरा येथील पूर्वा किशोर पाटील हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

या स्पर्धेत तिने सुरवातीला 15 वर्षे वयोगटात चाळीसगावच्या तनिषा साळुंखे हिला दोन सेट मध्ये नमवत जिल्हा विजेतेपद पटकावले, तद्नंतर 17 वर्षे वयोगटातील अंतिम सामन्यात चाळीसगावच्या ओवी पाटील हिचा अवघ्या दोन सेटमध्ये पराभव करत दुहेरी विजेते पदाचा बहुमान पटकावला. पूर्वा पाटील हिच्या प्रारंभिक लढती जळगावच्या मुलींसोबत झाल्या. स्पर्धेच्या सुरवातीपासूनच तिच्याकडे दर्शकांच्या नजरा खेळल्या होत्या. जिल्हा असोसिएशन चे पदाधिकारी, उपस्थित मान्यवर तसेच सचिव सौ शहा मॅडम यांचे हस्ते पूर्वा पाटील हिला गौरवण्यात आले

पूर्वा पाटील ही पाचोरा येथील युवा उद्योजक व बांधकाम व्यावसायिक किशोर आबा पाटील यांची कन्या आहे. कै पी. के. शिंदे विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या पूर्वा पाटील हिचे गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, उपाध्यक्ष नीरज भाई मुणोत, सेक्रेटरी ऍड. जे. डी. काटकर व सह सेक्रेटरी शिवाजी शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.