पाचोरा इंडियन मेडि.असो.अध्यक्षपदी डॉ जयंतराव पाटील तर सेक्रेटरीपदी डॉ स्वप्नीलदादा पाटील

पाचोरा इंडियन मेडि.असो.अध्यक्षपदी डॉ जयंतराव पाटील तर सेक्रेटरीपदी डॉ स्वप्नीलदादा पाटील

पाचोरा- पंचक्रोशीतील आरोग्य सेवेचा मानबिंदू असलेल्या पाचोरा- भडगाव IMA नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच पाचोरा शहरातील आशीर्वाद हॉल येथे डॉ मनोजदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर सेक्रेटरी डॉ शशिकांतदादा खानोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी नूतन अध्यक्षपदी डॉ जयंतराव पाटील तर सेक्रेटरीपदी डॉ स्वप्निलदादा पाटील खजिनदार पदी डॉ अनुपदादा अग्रवाल यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली
यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ मनोजदादा पाटील, डॉ शशिकांतदादा खानोरे, डॉ जयंतराव पाटील ,डॉ स्वप्नीलदादा पाटील , डॉ अनुपदादा अग्रवाल ,डॉ सुनीलदादा पाटील ,डॉ अनिलदादा झवर , डॉ सुरेशदादा बाहेती उपस्थीत होते या पद्भ ग्रहण सोहळ्या प्रसंगी पंचक्रोशीतील सन्मानीय IMS पाचोरा-भडगाव डॉक्टर सुमूहाने सहपरिवार उपस्थीती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली