वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी यांना संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करुण कर्याकर्णी जाहीर

वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी यांना संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्रांचे वाटपास झाली सुरूवात !

पाचोरा वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी यांना बैठकीत केले वेब मिडीया नियमांबद्दल सविस्तर मार्गदर्शन

उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल, जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया यांची उपस्थिती

पाचोरा प्रतिनिधी :

वेब मिडीया असोसिएशन ला जळगाव जिल्ह्यात कार्य करण्यासाठी दिड महिना झाला आणि मागील दिड महिन्यात वेब मिडीया असोसिएशन ची चर्चा गावागावात झाली हे खरचं सर्व पत्रकारांसाठी नवीन सुर्योदय आहे.म्हणुनचं जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत वेब मिडीया असोसिएशन चे पदाधिकारी यांची नेमणुक होऊन त्यांची चांगली टिमवर्क’सह कार्यकारिणीची घोषणा झाली.

सर्वांनी अतिशय चांगल्या पध्दतीने कामकाज करून वेब मिडीया असोसिएशन संघटन वाढीसाठी प्रयत्न जोरदार सुरू केले असुन लवकरच वेब मिडीया असोसिएशन जळगाव व पाचोरा चा ठसा अवघ्या महाराष्ट्रात उमटेल असे उद्गार व कौतुक संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांनी यावेळी केले.

संघटनेच्या पदांचा दुरूपयोग होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी* आणि संघटनेच्या पदांचा वापर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी करावा असे या बैठकित पदाधिकारी *यांना संबोधित करतांना अनिलभाऊ बोललेत.

वेब मिडीया असो.संघटनेची नियमावली व कामकाज पध्दती आणि पुढील कामाची रूपरेषा सर्वांना ठरवुन दिली.वैयक्तीक स्वार्थ व विचार ज्यांचा असेल त्यांनी तो विचार बाजुला ठेऊन संघटनेच्या *सर्वहितायं विचारांमध्ये समरस व्हावे असा कानमंत्र दिला.

यावेळी पाचोरा तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार व नियुक्ती पत्र देण्यात आले.लवकरच जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल, जळगाव जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया,म.रा.सदस्य योगेश पाटील सर,राजु भाऊ धनराळे,राहुल महाजन, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा सचिव नंदुभाऊ शेलकर, जिल्हा सचिव दिनेश चौधरी,जिल्हा संघटक एन एस भुरे , जिल्हा खजिनदार भुवनेश दुसाने, जिल्हा खजिनदार दिपक पवार, जिल्हा खजिनदार सचिन चौधरी, जिल्हा समन्वयक जावेद शेख, पाचोरा तालुका अध्यक्ष दिपक गढरी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका सचिव चिंतामण पाटील,तालुका सरचिटणीस रविशंकर पांडे,तालुका संघटक फकिरचंद पाटील,तालुका समन्वयक दिलीप पाटील वरखेडी, पाचोरा शहर अध्यक्ष प्रमोद बारी,शहर उपाध्यक्ष दिलीप परदेशी,शहर सचिव संदिप मराठे,सदस्य अनिल सावंत सर,किरण मोरे, स्वप्निल कुमावत,हितेश जाधव, सुनिल सोनार ( मधुराज ) हे सर्व उपस्थित होते व यांचा सत्कार आणि कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.लवकरच सदस्य यांना सदस्य नियुक्ती पत्र व सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांनी जाहिर केले आहे.