शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) तर्फे कुस्तीपटू शर्वरीचा सत्कार

शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) तर्फे कुस्तीपटू शर्वरीचा सत्कार

पाचोरा – (प्रतिनिधी) नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत ५४ किलो वयोगटात बुरानी इंग्लिश मेडियम स्कूल पाचोरा ची विद्यार्थिनी कु.शर्वरी निलेश कुलकर्णी रा.स्टेट बँक कॉलनी,पाचोरा हिने कौतुकास्पद कामगिरी केल्याने तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्या निवडीनिमित्त शर्वरीचे व तिच्या पालकांचा सत्कार शहराच्या मध्यवर्ती असलेल्या शिवतीर्थ या शिवसेना कार्यालय येथे शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला . व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
त्याप्रसंगी या विद्यार्थीनीचे मार्गदर्शक कैलास आमले सर (कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष,संस्थापक अध्यक्ष महावीर व्यायाम शाळा पाचोरा) , शर्वरीचे प्रशिक्षक दिनेश पाटील शर्वरीचे वडील निलेश कुलकर्णी , शर्वरीची आई स्मिता कुलकर्णी यांचाही सत्कार सौ.वैशालीताई यांनी केला. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख अनिल सावंत, दिपक पाटिल, दत्ता जडे, दादाभाऊ चौधरी, राजेंद्र राणा ,पप्पू जाधव,अभिषेक खांडेलवाल,अजय पाटील,हेमंत पाटील,राजूभैय्या पाटील,ग़फ़्फ़ारभाई, जितेंद्र जैन,युवासेना तालुका प्रमुख श्री.भुपेश सोमवंशी,शहरसंघटक प्रशांत सोनार,नाना वाघ,डि.डि.नाना,धर्मा आबा ,संतोष पाटील सर,शुभम राजपूत,अतुल चौधरी आदिसह सर्व शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.