आमदार सत्यजित तांबे यांची गिरणाई शिक्षण संस्थेला भेट

आमदार सत्यजित तांबे यांची गिरणाई शिक्षण संस्थेला भेट

पाचोरा-(प्रतिनिधी)
नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी काल दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी पाचोरा येथील गिरनाई शिक्षण संस्थेला भेट देऊन शिक्षक बांधवांशी हितगुज केली.

गिरणाई शिक्षण संस्थेचे संचालक तथा सहकार नेते सतीशबापू शिंदे यांनी आमदार सत्यजित तांबे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पि.के. शिंदे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही. गीते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष नीरज मनोज सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, मुख्याध्यापिका पूजा ताई शिंदे महेश देशमुख, समाधान महाजन, संजय मासाळ उपस्थित होते.

संस्थेचे उपाध्यक्ष नीरजभाई मनोज यांनी संस्थेच्या कार्याचा लेखाजोखा व गिरणाई शिक्षण संस्था संचलित विविध शाळांची गुणवत्ता, कार्यशाली,उपक्रमशीलता, नाविन्यता, तसेच ज्ञानवर्धक, समाजोपयोगी उपक्रमांची माहिती आमदार तांबे यांना करून दिली. गिरणाई शिक्षण संस्थेच्या गुणवत्तापूर्ण कार्यशैलीबद्दल आमदार तांबे यांनी गौरवोउद्गार काढले. आगामी काळात महाराष्ट्रातील शैक्षणिक उपक्रमांमध्ये वैज्ञानिक जाणीव जागृती, आर्थिक साक्षरता, राजकीय साक्षरता, संगणक साक्षरता यासारखे नवनवीन उपक्रम समाविष्ट करणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

ज्ञानेश्वर कोतकर यांनी सूत्रसंचालन केले. सौ सा.प. शिंदे शाळेचे मुख्याध्यापक एस एन पाटील यांनी आभार मानले. या भेटी प्रसंगी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व पदवीधर मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.